PM Modi On Congress: "काँग्रेस असेल तर मनी हाइस्ट फिक्शनची गरज कुणाला?"; पंतप्रधान मोदींनी साधला पुन्हा निशाणा

PM Modi On Congress
PM Modi On Congress
Updated on

PM Modi On Congress: झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरातून आतापर्यंत ३५१ कोटींहून अधिक रोकड सापडली आहे. एवढी रोकड आली कुठून, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या प्रकरणापासून काँग्रेसने स्वत:ला दूर केले असले तरी, भाजप रोख घोटाळ्यावर सातत्याने हल्ला करत आहे. भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाजपने काँग्रेसवर टीका करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त झाल्याचा व्हिडीओ भाजपने बनवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

धीरज साहू यांच्याविरुद्ध ६ डिसेंबरपासून प्राप्तिकराची कारवाई सुरू होती. त्यांच्या घरात सापडलेल्या पैशांचे फोटो आणि व्हिडीओ बनवून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आठवडाभरापासून त्यांच्या घरावर शोधमोहीम सुरू आहे. प्रचंड रोकड जप्त झाल्यानंतर काँग्रेस पक्षही बॅकफूटवर आहे.

रोख घोटाळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल X वर एका पोस्टमध्ये लिहिले की, "भारतात मनी हाइस्ट फिक्शनची कोणाला गरज आहे? जेव्हा तुमच्याकडे काँग्रेस सारखा पक्ष असेल, ज्याचे लुटारू 70 वर्षांपासून प्रसिद्ध आहेत आणि हा घोटाळा सुरू आहे. पीएम मोदींनी त्यांच्या पोस्टसोबत भाजपचा एक व्हिडिओही पुन्हा पोस्ट केला आहे."

PM Modi On Congress
शिवराज सिंह चौहानांचे मुख्यमंत्रीपद गेल्याने महिला समर्थक भावूक; 'मामां'समोर रडतानाचा Video आला समोर

केंद्रीय अंमलबजावणी संचालनालय (ईडी) धीरज साहूच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केल्याच्या प्रकरणाचीही चौकशी करू शकते. आयकर विभागाने या छाप्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाला दिली आहे. (Latest Marathi News)

PM Modi On Congress
भुजबळांकडे पेढे खायला अन् प्रफुल्ल पटेलांकडे जेवायला जाणार; उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.