"लता मंगेशकरांनी संपूर्ण देशाला एकत्र आणलं"; मोदींनी वाहिली लोकसभेत श्रद्धांजली

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले.
PM Narendra Modi at Lok Sabha
PM Narendra Modi at Lok Sabha
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोमवारी लोसकसभेत गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी लतादीदींच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी संपूर्ण देशाला एकत्र आणलं असं ते म्हणाले. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले. (PM Modi pays tribute to singing legend Lata Mangeshkar in Lok Sabha)

मोदी म्हणाले, "देशानं आदरणीय लता दीदींना गमावलं आहे. इतक्या मोठ्या काळासाठी ज्यांच्या आवाजानं देशाला मोहित केलं, प्रेरित केलं. देशाला भावनांनी भरुन टाकलं. त्यांनी देशाचा सांस्कृतीक वारसा संपन्न केला. देशाच्या एकतेला देखील त्यांनी सुमारे ३६ भाषांमध्ये गायलं हे एक प्रेरक उदाहरण आहे. मी आज लता दीदींना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो"

PM Narendra Modi at Lok Sabha
'महाराष्ट्रातून मजूरांना घरी पाठवल्याने कोरोना पसरला, याला काँग्रेस जबाबदार'

भारतरत्न लता मंगेशकर यांचं रविवारी ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडलेल्या लता दीदींच्या अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हजेरी लावली होती. विमानाने दिल्लीतून मुंबईत दाखल होत पंतप्रधानांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले त्यानंतर ते लगेचच दिल्लीला रवाना झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.