नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर, केंद्राने या राज्यांमध्ये कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचे छायाचित्र प्रकाशित करणे पुन्हा सुरू करण्याची योजना आखली आहे. पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर 8 जानेवारीला आचारसंहिता जारी करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना लसींच्या सर्टिफिकेटवरुन पंतप्रधानांचा फोटो हटवण्यात आला होता. (PM Modi Photo On Corona Vaccination Certificate)
पाच राज्यांतील मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आणि आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर 8 जानेवारी रोजी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांतील लसीकरण प्रमाणपत्रांवरून पंतप्रधान मोदींचा फोटो काढून टाकण्यात आला. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandvia) यांनी निवडणुका संपल्यानंतर या पाच राज्यांमध्ये कोविड लसीकरण प्रमाणपत्रांवर (Vaccination Certificate) पंतप्रधानांच्या फोटोची छपाई सर्वोच्च प्राधान्याने पुन्हा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय यासाठी कोविन अॅपवर आवश्यक ते बदल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.