PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महागाईवर मोठं वक्तव्य; म्हणाले, महागाई ही जगासमोरील...

PM Modi: देशातील महागाई दरात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे
PM Modi
PM ModiSakal
Updated on

PM Modi On Inflation: रक्षाबंधनापूर्वी केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करून देशवासीयांना मोठी भेट दिली होती. यानंतर देशभरात 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली.

या दिलासानंतर विनाअनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत 9 वर्षांपूर्वीच्या पातळीवर आली आहे. यासोबतच सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हे सिलिंडर आणखी स्वस्तात मिळत आहेत.

देशातील महागाई हा सरकारला घेरण्याचा विरोधकांचा मोठा मुद्दा राहिला आहे, तर स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतींबाबत रस्त्यापासून संसदेपर्यंत संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला आहे. एलपीजीच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत असल्याबाबत विरोधक सरकारला घेराव घालत आहेत.

PM Modi
eRupee By SBI: आता UPI द्वारे होणार डिजिटल रूपयाचे व्यवहार, SBI ने करोडो ग्राहकांना दिली ही सेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत महागाईवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, महागाई ही जगासमोरील प्रमुख समस्या आहे. ते म्हणाले की कोरोना महामारी आणि नंतर युद्धामुळे जागतिक महागाई वाढली आहे.

त्यामुळे विकसित देश आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्था या दोन्ही देशांना महागाईचा सामना करावा लागत आहे. हा एक जागतिक मुद्दा आहे.

PM Modi
RBI : दोन हजाराच्या नोटा ३० सप्टेंबरच्या रात्री १२ नंतर होणार चलनातून बाहेर

ते म्हणाले की, आमच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात, G20 अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नर यांची बैठक झाली होती. महागाईचा सामना करण्यासाठी प्रत्येक देशाने स्वीकारलेल्या धोरणांचा इतर देशांवर नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचे फोरमने मान्य केले. याव्यतिरिक्त, मध्यवर्ती बँकांद्वारे धोरणात्मक भूमिका वेळेवर घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.