Supreme Court Verdict on VVPAT : कोर्टाचा निकाल विरोधकांना थप्पड! ‘व्हीव्हीपॅट’वरून पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयाने मतांच्या फेरपडताळणीबाबत दिलेल्या आदेशांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधी पक्ष काँग्रेसवर जोरदार टीका केली.
PM Modi Slam Congress Over Supreme Court verdict on VVPAT Reservation  Marathi News Lok Sabha election 2024
PM Modi Slam Congress Over Supreme Court verdict on VVPAT Reservation Marathi News Lok Sabha election 2024
Updated on

अररिया (बिहार), ता.२६ (पीटीआय) : सर्वोच्च न्यायालयाने मतांच्या फेरपडताळणीबाबत दिलेल्या आदेशांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधी पक्ष काँग्रेसवर जोरदार टीका केली. न्यायालयाने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीला थप्पड लगावली असून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत (ईव्हीएम) अविश्वास निर्माण करण्याचे पाप केल्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागायला हवी असे मोदी यांनी येथील सभेत बोलताना नमूद केले.

काँग्रेस पक्ष हा इतर मागासवर्गीय (ओबीसी), अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण चोरण्याचा प्रयत्न करत असून त्यांना ते स्वतःच्या आवडीची मतपेढी असलेल्या मुस्लिमांना द्यायचे असल्याचेही मोदींनी सांगितले.

‘‘काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि इंडिया आघाडीतील अन्य पक्ष सत्तेमध्ये होते तेव्हा गरीब, मागासवर्गीय आणि दलित यांना मतदानाच्या अधिकारापासून दूर ठेवले जात असे. त्यावेळी मतदान केंद्रेच ताब्यात घेतली जात असे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर सुरू झाल्यानंतर अनेकांना हा जुना खेळ सोडून द्यावा लागला त्यामुळेच त्यांनी ‘ईव्हीएम’बाबत अविश्वास निर्माण करायला सुरूवात केली. काही तासांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणात महत्त्वपूर्ण आदेश देताना विरोधी पक्षांना थप्पड लगावली आहे,’’ असे मोदी यांनी सांगितले.

‘‘ देशातील संपत्तीवर पहिला अधिकार हा गरीब जनतेचा आहे. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि त्यांचे मित्र पक्ष हे मात्र पहिला अधिकार हा त्यांच्या मतपेढीचा असल्याचे मानतात. तुमच्या मालकीच्या वस्तू देखील त्यांना चोरायच्या आहेत. महिलांचे मंगळसूत्र देखील ते काढून घेतील,’’ असे मोदी यांनी सांगितले.

PM Modi Slam Congress Over Supreme Court verdict on VVPAT Reservation  Marathi News Lok Sabha election 2024
Onion News: महाराष्ट्राच्या कांद्यावर निर्यातबंदी, पण गुजरातचा कांदा होणार एक्सपोर्ट, मोदी सरकारचा निर्णय

ओबीसींच्या समस्या ठावूक

‘‘ मी स्वतः ओबीसी आहे त्यामुळे या घटकाला नेमक्या कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते याची मला पूर्ण कल्पना आहे. भविष्यामध्ये हीच विरोधी पक्षीय मंडळी अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण लुटण्याचे काम करतील. डॉ. मनमोहनसिंग यांचे आधीचे सरकार हे मुस्लिम आरक्षणाला अनुकूल होते. आता काँग्रेस पक्ष आणि त्यांची इकोसिस्टिम हेच काम करत आहेत,’’ असे मोदी यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे विरोधकांचे पितळ उघडे पडले असून निवडणूक आयोगाला बदनाम करण्याची कोणतीही संधी त्यांनी सोडली नव्हती. भाजपच्यावतीने मी या निकालाचे स्वागतच करतो.

- अर्जुनराम मेघवाल, केंद्रीय कायदामंत्री

PM Modi Slam Congress Over Supreme Court verdict on VVPAT Reservation  Marathi News Lok Sabha election 2024
Railway News: वंदे भारत, तेजस एक्सप्रेस पावसाळ्यात रद्द? बुकिंग पोर्टलवर गाडी रद्दचा संदेश

व्हीव्हीपॅटचा आग्रह कायम ः रमेश

‘‘निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अधिक वृद्धिंगत होण्यासाठी काँग्रेस पक्ष व्हीव्हीपॅटच्या अधिकाधिक वापरासाठी आग्रही राहील. आम्ही आमच्या राजकीय प्रचारामध्ये हाच मुद्दा सातत्याने मांडत राहू. आज सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅट संदर्भातील जी याचिका फेटाळून लावली त्यामध्ये काँग्रेस पक्ष हा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पक्षकार नव्हता,’’ असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालाची आम्ही नोंद घेतली असून व्हीव्हीपॅटचा अधिकाधिक वापर व्हावा म्हणून आम्ही राजकीय आघाडीवर प्रचार करत राहू असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.