तुम्ही हे पाहिलं नाही का? PM मोदींना काँग्रेस खासदाराचा सवाल

PM Modi and Congress MP
PM Modi and Congress MPSakal
Updated on
Summary

काँग्रेसवाल्यांनी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर कामगारांना तिकीट देऊन घरी पाठवलं, त्यांनी कोरोना पसरवला असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत म्हटलं.

नवी दिल्ली - लोकसभेत (Lok Sabha) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाषण करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, या भाषणात मोदींनी केलेल्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक झाले आहे. काँग्रेस (Congress) खासदार अधीर रंजन चौधरी यांनी मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आमचा पक्ष मेक इंडिया (Make In India) नाकारत नाही. ही घोषणा आजची नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी पहिल्यांदा ही घोषणा दिली होती. आमचा प्रश्न मोदींना असा आहे की, चीनमधून (China) भारतात (India) आयात वाढून ६९ अब्ज डॉलर झाली आहे. अशा परिस्थितीत तुमच्या सरकारचे आत्मनिर्भर भारत मिशन कुठे आहे.

काँग्रेसवर निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'मेक इन इंडियाची खिल्ली उडवली गेली. जर आम्ही लोकलसाठी व्होकल होण्याचं आवाहन केलं तर यावरही लोकांनी खिल्ली उडवण्याचं काम केलं.' मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार अधीर रंजन यांनी काही प्रश्न उपस्थित केले.

PM Modi and Congress MP
'महाराष्ट्रातून मजूरांना घरी पाठवल्याने कोरोना पसरला, याला काँग्रेस जबाबदार'

लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी नरेंद्र मोदींना प्रश्न केला की, लॉकडाऊनची घोषणा कोणी केली? कामगारांच्या खाण्या-पिण्याची सोय करण्यात आली नव्हती, तुम्ही हे पाहिलं नाही का? उपाशी पोटी, पायाला चटके बसत असताना लोकांनी प्रवास केला. लॉकडाऊनच्या काळात झालेल्या लाखो मृत्यूंना जबाबदार कोण? असा प्रश्नही अधीर रंजन यांनी विचारला.

पंतप्रधान मोदींनी लोकसभेत म्हटलं की, कोरोनाच्या काळात काँग्रेसने पातळी ओलांडली. पहिल्या लाटेत लोक लॉकडाऊनचं पालन करत असताना त्यांनी लोकांना रेल्वेनं घरी पाठवलं. काँग्रेसचे नेते मुंबईच्या स्टेशनवर उभा होते आणि निर्दोष लोकांना घाबरवत होते असा आरोप मोदींनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.