PM Modi Speech: 'देश मणिपूरच्या जनतेसोबत, शांततेनेच यावर तोडगा निघेल'; स्वातंत्र्यदिनी PM मोदींनी लाल किल्ल्यावरून दिले आश्वासन

स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना PM मोदींनी लाल किल्ल्यावरून दिले आश्वासन
PM Modi Speech
PM Modi SpeechEsakal
Updated on

देश आज 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केलं. पंतप्रधानांची ध्वजारोहण करण्याची ही 10 वी वेळ आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संपूर्ण देश उत्साहात आहे. यासोबतच दिल्लीपासून जम्मू-काश्मीरपर्यंत सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांवर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सध्या धुमसत असणाऱ्या मणिपूरवरती भाष्य केलं आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. अनेकांनी आपल जीव गमावलं. पण आता हळूहळू शांतता निर्माण होत आहे. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. शांततेनेच यावर तोडगा निघेल असं पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात मणिपूरचा उल्लेख केला आणि देश मणिपूरच्या जनतेसोबत असल्याचे सांगितले. गेल्या काही आठवड्यांमध्ये मणिपूर आणि भारताच्या काही भागात हिंसाचाराचा काळ सुरू होता, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. काही दिवसांपासून सातत्याने शांततेच्या बातम्या येत आहेत. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे, गेल्या काही दिवसांपासून जी शांतता कायम आहे, ती मणिपूरच्या जनतेने पुढे न्यावी. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्र काम करत आहे असंही ते पुढे म्हणाले आहेत.

तसेच यावेळी नैसर्गिक आपत्तीमुळे देशाच्या अनेक भागात संकट निर्माण झाली आहेत. ज्यांनी हे सहन केले त्यांच्याबद्दल मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. राज्य आणि केंद्र सरकार लवकरच त्यांना सर्व त्रास कमी करण्याचा प्रयत्न करेल असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

हे भारतातील अमृतकालचे पहिले वर्ष

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'भारताच्या अमृतकालचे हे पहिले वर्ष आहे. आपण तारुण्यात जगत आहोत. आपण भारतमातेच्या कुशीत जन्म घेतला आहे. माझे शब्द लिहा, या काळात आपण जी पावले टाकू, आपण जे त्याग करू, जी तपश्चर्या करू, त्यातून येत्या एक हजार वर्षांचा देशाचा सुवर्ण इतिहास अंकुरणार ​​आहे. या काळात घडलेल्या घटना पुढील 1000 वर्षांसाठी प्रभाव निर्माण करतील.पंचप्राणात झोकून देऊन देश एका नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.