Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी PM मोदींनी सुरू केलं 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान; ऑडिओ संदेश केला शेअर

अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी फक्त ११ दिवस बाकी आहेत.या सोहळ्यासाठी देशभरात तयारी केली जात असून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandiresakal
Updated on

अयोध्येत राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्रभू श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी फक्त ११ दिवस बाकी आहेत. या सोहळ्यासाठी देशभरात तयारी केली जात असून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान करणार आहेत. यासाठी त्यांनी एक विशेष ऑडिओ संदेश देखील जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत मोदींनी याबद्दल माहिती दिली आहे. अयोध्येतील रामललाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघे ११ दिवस शिल्लक राहिले आहेत. हे माझे भाग्य आहे की मी देखील या शुभ सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या काळात मला सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी परमेश्वराने दिली आहे. हे लक्षात घेऊन मी आजपासून 11 दिवसांचा विशेष विधी सुरू करत आहे. मला तुम्हा सर्वांचे, जनतेचे आशीर्वाद अपेक्षीत आहेत आहे. अशा वेळी माझ्या भावना शब्दात मांडणे फार कठीण आहे, मात्र मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे...

Ayodhya Ram Mandir
Deccan Queen : मुंबईच्या दिशेने जाणारी 'डेक्कन क्विन' लोणावळ्यात अडवली! अखेर पोलीसांनी काढली स्थानिकांची समजूत

या व्हिडीओच्या सुरूवातीला पीएम मोदी यांनी राम-राम म्हणत केली आहे. पुढे मोदी म्हणालेत की, आयुष्यातील काही क्षण हे दैवी आशीर्वादामुळेच वास्तवात येतात. आजचा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी आणि जगभरात पसरलेल्या राम भक्तांसाठी एक पवित्र पर्व आहे. सर्वत्र प्रभू श्री रामाच्या भक्तीचं अद्भुत वातावरण पसरलं आहे.

सर्वांना २२ जानेवारीची प्रतिक्षा आहे. अयोध्येत रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठेसाठी अवघे ११ दिवस राहीले आहेत. या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी मलाही मिळत आहे हे माझे भाग्य आहे, असेही मोदी त्यांच्या ऑडिओ संदेशात म्हणाले आहेत. संपूर्ण ऑडिओ संदेश खाली देण्यात आला आहे.

Ayodhya Ram Mandir
Spina Bifida : राज्यातील लहान मुलांमध्ये वाढतंय 'स्पाइना बिफिडा' आजाराचं प्रमाण; ७० टक्के पालकांमध्ये नाही जागरुकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.