PM Modi Swearing-In Ceremony: 72 जणांच्या मोदी 3.0 मंत्रिमंडळात किती महिलांना स्थान?, यादी पाहा...

Narendra Modi Cabinet 3.0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात सात महिला मंत्र्यांना स्थान मिळाले आहे.
PM Modi Swearing-In Ceremony news
PM Modi Swearing-In Ceremony newsesakal
Updated on

नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंची बरोबरी केली आहे.  त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे मोदी हे देशातील एकमेव पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण 72 मंत्र्यांचे मंत्रिमंडळ आहे. या मंत्रिमंडळात महिलांचा सहभाग महत्त्वाचा असावा, याची विशेष काळजी मोदींनी घेतली आहे.

मोदी मंत्रिमंडळात महिला शक्तीला स्थान देण्यात आले आहे. याशिवाय कॅबिनेट मंत्र्यांसह राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात सात महिला मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. माजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर पंतप्रधानांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

सीतारामन यांच्याशिवाय माजी राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, उत्तर प्रदेशमधून निवडून आलेल्या अनुप्रिया पटेल आणि कर्नाटकमधून निवडून आलेल्या शोभा करंदलाजे यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या महिला नेत्यांमध्ये 37 वर्षीय रक्षा खडसे यांच्या नावाचाही समावेश आहे.

या मंत्रिमंडळातील त्या सर्वात तरुण महिला मंत्री असल्याने त्यांचीही चर्चा होत आहे. याशिवाय सावित्री ठाकूर आणि नीमू बेन बांभनिया यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

PM Modi Swearing-In Ceremony news
Narendra Modi Oath Ceremony: भरलेली लिची, बाजरीची खिचडी, मटका कुल्फी... शपथविधी समारंभानंतर खासदार मारणार ताव, 'असा' आहे मेनू

यावेळी मोदी मंत्रिमंडळात काय आहे खास?

30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 36 राज्यमंत्र्यांच्या यादीत 27 ओबीसी, 10 एससी, 5 एसटी आणि 5 अल्पसंख्याक खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी 11 मंत्री एनडीएच्या घटक पक्षातील आहेत.

43 मंत्री तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा खासदार राहिले आहेत. यापूर्वीही 39 मंत्री केंद्रीय मंत्री राहिले आहेत. यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात 23 मंत्री समाविष्ट आहेत. विधानसभेत 34 मंत्री निवडून आले आहेत.

PM Modi Swearing-In Ceremony news
Oath Ceremony Updates: जंबो मंत्रिमंडळाचा शपथविधी; नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान; एकूण ७२ जणांचा केंद्रात समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.