PM मोदी आज UNSC बैठकीच्या अध्यक्षस्थानी; जाणून घ्या 10 मुद्दे

narendra modi
narendra modi
Updated on
Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीची (UNSC) अध्यक्षता करणार आहेत. यावेळी ते UNSC च्या सागरी सुरक्षेवरील खुल्या चर्चेमध्ये सहभागी होतील.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीची (UNSC) अध्यक्षता करणार आहेत. यावेळी ते UNSC च्या सागरी सुरक्षेवरील खुल्या चर्चेमध्ये सहभागी होतील. 'सागरी सुरक्षेला चालना : आंतरराष्ट्रीय सहयोगाची आवश्यकता' असा चर्चेचा विषय आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) माहितीनुसार या बैठकीत यूएनएससीच्या सदस्य देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि सरकार प्रमुख आणि संयुक्त राष्ट्र संघटनचे उच्च स्तरीय विशेतज्ज्ञ सहभागी होतील. सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणारे पंतप्रधान मोदी पहिले भारतीय आहेत. या बैठकीसंबंधी 10 महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया...(UNSC National Latest News)

1. 75 वर्षानंतर पहिल्यांना भारतीय पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या 15 सदस्यीय गटाच्या एका कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत.

2. चर्चेमध्ये सागरी गुन्हा आणि असुरक्षेचा प्रभावी पद्धतीने सामना करण्यासाठी आणि सागरी क्षेत्रातील समन्वय मजबूत करण्याकडे लक्ष देण्यात येईल

narendra modi
शेतकऱ्यांसाठी आज आनंदाचा दिवस! PM मोदी खात्यात जमा करणार पैसे

3. सागरी सुरक्षेचा व्यापक दृष्टीकोण, वैध सागरी उपक्रमांचे संरक्षण आणि समर्थन करण्यासाठी सक्षम होणे, तसेच या माध्यमातून सागरी क्षेत्रातील पारंपरिक आणि बिगर-पारंपरिक संकटांचा सामना केला जाईल.

4. आमच्या सभ्यतेवर आधारित लोकनीती, सागरी शांती आणि समृद्धी महत्त्वाचे मानते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी 2015 मध्ये सागरी (एसएजीएआर- क्षेत्रात सर्वप्रकारची सुरक्षा आणि विकास) दृष्टीकोण समोर ठेवला. यामुळे स्थिर सागरी क्षेत्र निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे.

5. बैठकीस सहभागी होणारे नेते- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोचे अध्यक्ष फेलिक्स-एंटोनी त्येसीकेदी त्शिलोम्बो आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन

6. आज कार्यक्रमात भाग घेणाऱ्या नेत्यांमध्ये नायजेरीयाचे राष्ट्रपती मोहम्मद बजूम, केनीयाचे राष्ट्रपती उहुरा केन्याटा आणि व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांचा समावेश आहे

narendra modi
'मुख्यमंत्र्याने इतर झेंडा घेऊन बसूच नये'; तिरंग्याच्या बरोबरीतल्या भगव्याबाबत आक्षेप

7. मागील आठवड्यात अफगाणिस्तानच्या भीषण स्थितीच्या मुद्द्यावर भारताच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती. देशातील स्थिती बिघडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आणि काहीतरी तोडगा काढण्याचे आवाहन करण्यात आले.

8. पाकिस्तानने निमंत्रण न दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे. शुक्रवारी यूएनएससीच्या बैठकीनंतर एका प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी राजदूत मुनीर अकरम म्हणाले होते की, आम्ही भागिदारीसाठी औपचारिक विनंती केली होती, पण ती स्वीकारी गेली नाही.

9. भारत यावर्षी ऑगस्ट महिन्यासाठी यूएनएससीची अध्यक्षता करत आहे. 1 ऑगस्टपासून भारत ही जबाबदारी सांभाळत आहे.

10. संयुक्त राष्ट्र परिषदेचे केवळ पाच सदस्य आहेत. यात अमेरिका, चीन, ब्रिटन, रशिया आणि फ्रान्स यांचा समावेश आहे. सध्या भारत दोन वर्षांसाठी सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य आहे. संयुक्त राष्ट्राचा कायमस्वरुपी सदस्य होण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.