PM Modi in UP : लखीमपूर खेरी प्रकरण पेटलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता.५) उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर येत आहेत. लखनौ तेथे ते एका नागरी परिषदेसह विविध विकासकामांचे उद्घाटनही करणार आहेत. भारताच्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवा निमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लखनौमध्ये 4737 कोटी रुपयांच्या 75 विकासकामाचं लोकार्पण करणार आहेत. तसेच तीन दिवसांच्या 'न्यू अर्बन इंडिया कान्क्लेव'चा शुभारंभही करणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम सुरु होण्याची शक्यता आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी लखीमपूर खेरी प्रकरण काय बोलणार? याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 75 जिल्ह्यातील 75 हजार गरीब कुटुंबियांना घराचा ताबा दिला जाणार आहे. तसेच काही लाभार्थ्यांसोबत पंतप्रधान संवादही साधणार आहेत. त्यासोबतच स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत उत्तर प्रदेशमधील 10 स्मार्ट सिटीच्या यशानिमित्त 75 कथांच्या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत. त्यासोबत लखनौ, कानपूर, गोरखपूर, झांसी, प्रयागराज, गाजियाबाद आणि वाराणसी या शहरांसाठी 75 इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन करणार आहेत.
उत्तर प्रदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबासाहेब भीमराव अंबेडकर विद्यापीठ (बीबीएयू), लखनौमध्ये अटल बिहारी वाजपेयी अध्यासनाच्या स्थापनेची घोषणा करणार आहेत.
परिषद आणि प्रदर्शनाविषयी
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत गृह निर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने 5 ते 7 ऑक्टोबर 2021 या काळात या परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. उत्तर प्रदेशात परिवर्तनकारी बदलांवर विशेष लक्ष केंद्रित करत ‘नागरी परिदृश्य परिवर्तन’ ही याची संकल्पना आहे. या परिषद आणि प्रदर्शनात सर्व राज्ये/केंद्र शासित प्रदेश सहभागी होणार असून अनुभवांची देवाणघेवाण आणि पुढील कार्यवाहीसाठी दिशा यादृष्टीने याची मदत होणार आहे.
या परिषद आणि एक्स्पोमधली तीन प्रदर्शने याप्रमाणे आहेत-
नव नागरी भारत या प्रदर्शनात परिवर्तनकारी नागरी अभियानांची कामगिरी आणि भविष्यातले नियोजन याचे दर्शन यामध्ये घडेल. गेल्या सात वर्षात नागरी अभियाना अंतर्गत कामगिरी आणि भविष्यातले नियोजनही इथे पाहायला मिळेल.
ग्लोबल हाउसिंग टेक्नोलॉजी चलेंज अंतर्गत भारतीय गृहनिर्माण तंत्रज्ञान मेळा - (आयएचटीएम) यामध्ये 75 कल्पक बांधकाम तंत्रज्ञानावर प्रदर्शन, यात देशांतर्गत विकसित स्वदेशी आणि कल्पक बांधकाम तंत्रज्ञान, साहित्य आणि प्रक्रिया यांची झलक अनुभवायला मिळेल.
नागरी अभियाना अंतर्गत 2017 नंतर उत्तर प्रदेशची कामगिरी आणि उत्तर प्रदेश@75 : उत्तर प्रदेशातले नागरी परिदृश्य परिवर्तन या संकल्पनेसह भविष्यावर दृष्टीक्षेप टाकणारे प्रदर्शन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.