PM Modi Video : पंतप्रधान निवासस्थानी झालं नव्या पाहुण्याचं आगमन; नाव ठेवलं 'दीपज्योती'; PM मोदींनी शेअर केला गोड व्हिडीओ

PM Modi Video With cow calf Deepjyoti : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत एक्स अकाउंट वरून यासंबंधीची व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.
PM Modi Video
PM Modi Video
Updated on

लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी नवीन सदस्याचे आगमन झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. यासोबतच या नव्या पहुण्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करण्यात आले आहेत. खरे तर पंतप्रधानांच्या निवासस्थानी एका गायीने एका वासराला जन्म दिला आहे. या वासराच्या कपाळावर एक 'ज्योती'ची खूण आहे. या गायीच्या वासरासोबतचे काही गोड फोटो तसचे एक व्हिडीओ पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.