Indian Politics : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. इकडे विरोधकांची आघाडी 'INDIA' अलर्ट मोडवर असतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील NDA मध्ये देखील हलचालींना वेग आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीएम मोदी येत्या १० दिवसात एनडीएच्या ४०० हून अधिक खासदारांची भेट घेणार आहेत. विशेष बाब म्हणजे १८ जुलै रोजीच एनडीएला २५ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने एनडीएमधील ३९ पक्षांची बैठक पार पडली आहे. दरम्यान आता या भेटीच्या माध्यमातून मोदी आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठीची रणनिती निश्चित करतील.
प्लॅन काय आहे?
भाजपने एनडीएच्या ४३० खासदारांना ११ प्रदेशांमध्ये विभागले आहे. आता पंतप्रधान मोदी प्रदेख प्रदेशात ३१ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान खादारांना भेटण्याची प्लॅनिंग करत आहेत. पंतप्रधान मोदी आणि खासदारांमध्ये होणाऱ्या या बैठकीची चयारी केंद्रिय मंत्री संजीव बालयान, बीएल वर्मा, धर्मेंद्र प्रधान आणि शांतनु ठाकुर करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ३१ जुलै रोजी पहिल्याच दिवशी मोदी उत्तर प्रदेशच्या कानपूर, बृज, बुंदेलखंड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील खासदारांना भेटतील. ८३ खासदारांसोबतची ही भेट दोन टप्प्यात होणार आहे. येथे भाजपचे प्रमुख भगत जगत, प्रकाश नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित राहू शकतात. याखेरीज दुसऱ्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रक्षा मंत्री राजनाथ सिंह हे देखील सहभागी होतील.
तर तिसऱ्या आणि चौथ्या क्लस्टरची बैठक २ ऑगस्ट रोजी होईल, यामध्ये उत्तर प्रदेशमधील काशी, गोरखपूर आणि अवध, तेलंगना, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, पद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप येथील ९६ खासदार सहभागी होतील, ३ ऑगस्ट रोजी पाचव्या आणि सहव्या क्लस्टरची बैठक होईल, त्यामध्ये बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगड, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मिर, लद्दाख येथील ६३ खासदार सहभागी होतील.
तर राजस्थान महाराष्ट्र आणि गोवा येथील ७६ खासदारांना पीएम मोदी ८ ऑगस्ट रोजी भेट घेतील. सोबतच ९ ऑगस्ट रोजी मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, दादर आणि नगर हवेली, दमन आणि दीव येथील ८१ खासदारांसोबत चर्चा होईल. विशेष बाब म्हणजे लवकरच इशान्येकडील ३१ खासदारांना भेटीची तारीख देखील लवकरच निश्चित केली जाणार आहे.
उद्देश काय आहे?
बैठकीदरम्यान खासदार आपआपल्या प्रदेशातील काम आणि केंद्रीय योजनांच्या स्थितीची माहिती देतील. यासोबतच लोकांशी जोडले जाण्याबाबत देखील मदत घेतली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत टीम मोदीमधील सर् २१ केंद्रीय मंत्री देखील सहभागी असतील. यामाध्यामातून पहिल्यांदाच एनडीएचे खासदार प्रदेशनिहाय पंतप्रधान मोदींशी भेटणार आहेत. भाजप लोकसभा निवडणूकीत ५० टक्के वोट शेअर मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.