नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबा या आज १०० वर्षांच्या झाल्या, यानिमित्त मोदींनी खास ब्लॉग लिहिला असून या ब्लॉगला 'माँ' असं नाव दिलं आहे. या ब्लॉगमधून त्यांनी आपल्या आईनं आपली जडणघडण कशी केली याची माहिती दिली आहे. आज आपण देशाचे पतंप्रधान बनलो आहोत त्यामध्ये आई-वडिलांच्या संस्कारांचा मोठा वाटा असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे. (PM Modi writes blog on his Mother on her 90s birthday revived many old memories)
मोदी आपल्या ब्लॉगमध्ये म्हणतात, माझी आई सामान्य आहे पण तितकीच असामान्य पण आहे. शंभर वर्षांपूर्वी आलेल्या जागतीक महामारीत माझ्या आईच्या आईचा मृत्यू झाला. त्यामुळं माझ्या आईला आईचं प्रेम मिळालं नाही. आईला शाळेचं दारही पहायला मिळालं नाही, तिनं केवळ गरिबीच पाहिली आहे. बालपणीच्या संघर्षानं माझ्या आईला खूपच लवकर मोठं बनवलं. आपल्या भावंडांमध्येही ती मोठी होती अन् सासरी मोठी सून. त्यामुळं सहाजिकच तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या. वडनगरमध्ये आमचं घर हे केवळ मातीच्या भिंती होत्या. या घरात आम्ही भावंड आणि आई-वडील राहत होतो. अशातचही कोणाताही तणाव न घेता माझ्या आई-वडिलांनी त्यांचं कर्तव्य चांगल्याप्रकारे पार पाडलं.
घरातून लवकर बाहेर पडून चहाच्या गाडीवर जाण्याचं वडिलांचं नित्यकर्म होतं. वडिलांना घराबाहेर पडण्यापूर्वी आई भल्या पहाटे ४ वाजता उठायची. आपल्या मुलांनीनी शिक्षण सोडून आपली मदत करावी असं आईला कधीही वाटलं नाही. उलट आम्हा भावंडांना आई-वडिलांना मदत करावीशी वाटत असे. घर खर्च चालवण्यासाठी माझ्या आईनं दुसऱ्यांच्या घरची धुणी-भांडीही केली. वेळ काढून चरखाही तिनं चालवला आहे. स्वतःच्या कामासाठी दुसऱ्यांवर अवलंबून रहाणं आईला आवडत नव्हतं. घर स्वच्छ ठेवणं ही आईची प्राथमिकता असायची, असंही मोदींनी आईची आठवण सांगताना ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.
अंधश्रद्धेपासून आई कायम दूर राहिली - मोदी
माझ्या आईचा माझ्यावर कायम अतूट विश्वास राहिला आहे. तिनं दिलेल्या संस्कारावर तिचा पूर्ण भरवसा आहे. माझ्यासोबत ती कधी कार्यक्रमांमध्ये येत नाही. पण एकदा एका कार्यक्रमात ती आली होती तेव्हा तिनं माझ्यावर टीकाही केली होती. ईश्वरावर माझ्या आईची मोठी भक्ती आहे पण ती अंधश्रद्धेपासून दूर राहते. सुरुवातीपासूनच ती कबीरपंथी राहिली आहे. आजही ती त्याच परंपरेतून पूजापाठ करते, अशा शब्दांत त्यांनी आईच्या वैशिष्ट्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
सिद्धांतावर ठाम राहण्याचा, गरिबांसाठी काम करण्याचा आईचा सल्ला
आईला याची जाणीव होत होती की मी वेगळ्याच दिशेनं जात आहे. मी घर सोडण्याचा निर्णय घेतला पण याची जाणीव आईला आधीच झाली होती. आईनं मला कायमचं आपल्या सिद्धांतांवर ठाम राहण्याचा आणि गरीबांसाठी काम करण्याला प्रेरित केलं. माझं मुख्यमंत्री होणं नश्चित झालं तेव्हा मी गुजरातमध्ये नव्हतो. थेट एअरपोर्टवरुन आईला भेटायला गेलो होतो. पण काम करताना तू लाच घेऊ नकोस.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.