नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन हे दोघेही जबाबदार नेते असून भारत-चीन सीमावादाचा प्रश्न सोडवण्यासाठी ते सक्षम आहेत, असा विश्वास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर हा प्रश्न सोडवताना अतिरिक्त प्रादेशिक शक्तींची गरज नसल्याचं सांगताना भारत-चीन परस्परातील सीमावाद सोडवतील असंही त्यांनी म्हटलं आहे. (PM Modi Xi Jinping capable of solving border issue Russian President Putin)
"होय मला माहिती आहे की भारत आणि चीनमध्ये काही वाद आहेत. पण शेजारी राष्ट्रांमध्ये अशा प्रकारचे वाद नेहमी होतंच असतात. पण भारताचे पंतप्रधान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष या दोन्ही जागतीक नेत्यांचा दृष्टीकोन मला माहिती आहे. हे दोघेही खूपच जबाबदार लोक असून एकमेकांना पुरेसा सन्मान देत ते कायमच आपल्यासमोरील प्रश्नावर तोडगा काढतील. पण हे महत्वाचं आहे की, इतर कुठल्याही अतिरिक्त प्रादेशिक शक्तींनी यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नाही" व्हर्च्युअल बैठकीदरम्यान पीटीआयशी बोलताना पुतिन बोलत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारतीय लष्कर चीनच्या लष्करासमोर उभं ठाकलं आहे. या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी हे भाष्य केलं आहे.
भारत-चीनमध्ये डिप्लोमॅटिक चर्चा सुरु
भारत आणि चीन या दोन्ही देशांनी गेल्या मे महिन्यापासून या वर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत दोन्ही बाजूंचे सैन्य तैनात केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये अनेकदा झालेल्या सैन्यबैठकीतनंतर पँगॉंग लेकच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन हे सैन्य मागे घेण्यात आले होते. त्याचबरोबर हॉटस्प्रिंग, गोग्रा आणि देपसंग येथील काही तणावाच्या भागातून सैन माघारीसाठी डिप्लोमॅटिक चर्चा सुरु आहे.
इंडिया-रशिया संबंध
रशियाचं चीनसोबत वाढत असलेली जवळीकता आणि त्याचा रशिया आणि भारतावर होत असलेल्या परिणामांबाबत बोलताना पुतिन म्हणाले. "भारत आणि रशियामधील संबंध वेगाने तयार होत आहेत. परस्पर विश्वासावर हे संबंध विकसित होणार आहेत. भारतासोबतच्या आमच्या उच्च पातळीवरील सहकार्याचं आम्ही कौतूक करतो. अर्थव्यवस्था, ऊर्जा आणि हाय टेक्नॉलॉजी तसेच संरक्षण या क्षेत्रांमध्ये आमचं सहकार्य कायम आहे. मी केवळ रशियन युद्ध सामर्गीबाबत बोलत नसून आमच्यामध्ये विश्वासावर बरंच अवलंबून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.