मोदी सरकारने लोकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त कामं केली - सर्वेक्षण

सरकार कोविड -19 संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला हाताळण्यासाठी चांगले तयार आहे आणि अर्थव्यवस्था प्रभावीपणे व्यवस्थापित केल्याचं या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांनी सांगितलं.
pm modi
pm modigoogle
Updated on

अत्यावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती आणि बेरोजगारी याविषयी चिंता व्यक्त केली जात असली तरी कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सर्वोच्च रेटिंग मिळाल्याचं ताज्या सर्वेक्षणात दिसून आलंय. LocalCircles ने केलेल्या या पोलमध्ये ६४,००० लोकांपैकी ६७% लोकांच्या मते, पंतप्रधान मोदींच्या सरकारने दुसऱ्या टर्ममध्ये अपेक्षा पूर्ण केल्या आहेत किंवा त्यापेक्षा जास्त कामं केली आहेत. (Narendra Modi Government)

pm modi
नरेंद्र मोदी सरकारकडून आश्‍वासनपूर्तीचे प्रयत्‍न

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी (PM Narendra Modi) सरकारचं रेटिंग ५१ टक्क्यांवरून ६२ टक्क्यांवर गेलं आहे. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या लोकांनी सांगितलं की सरकार कोविड -19 संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला हाताळण्यासाठी चांगले तयार आहे आणि अर्थव्यवस्था प्रभावीपणे व्यवस्थापित केली आहे. तरीही वर्षाच्या सुरुवातीपासून बेरोजगारी ७% च्या आसपास राहिल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती आणि ४७ टक्के लोकांनी असं म्हटलंय की सरकार या समस्येचं निराकरण करू शकलेलं नाही.

pm modi
प्रसिद्धी, व्यवस्थापनातून मतांचं भरघोस पीक, मोदी सरकारची आठ वर्ष

७३ टक्के लोकांनी सांगितलं की ते त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याबद्दल आशावादी आहे. ४४ टक्के लोकांना असं वाटतं की सरकारने हवेचा दर्जा आणि प्रदुषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात कमी पडलं. सांप्रदायिक एकोपा टिकवण्यात सरकार प्रभावी ठरलं असं ६० टक्के लोकांचं म्हणणं असून ३३ टक्के लोकांना हे मान्य नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.