PM Museum : आता मोदींसोबत काढता येणार फोटो! जाणून घ्या पीएम म्युझियमची खासियत

पीएम म्युझियमची खासियत म्हणजे तुम्ही पीएम मोदींपासून ते नेहरूंपर्यंत सर्वांसोबत फिरू शकता
PM Museum
PM Museumesakal
Updated on

PM Museum : पीएम म्युझियमची खासियत म्हणजे तुम्ही पीएम मोदींपासून ते नेहरूंपर्यंत सर्वांसोबत फिरू शकता आणि त्यांच्या सोबत फोटो ही काढू शकता. दिल्लीतील तीन मूर्ती मार्गावर 15,600 चौरस मीटर क्षेत्रफळावर आणि 306 कोटी रुपये खर्चून बांधलेल पंतप्रधान संग्रहालय अशा तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलं आहे, ज्याद्वारे तुम्ही भारताचा भूतकाळ जाणून घेता येणार आहे शिवाय तो पाहता देखील येणार आहे.

एवढंच नाही तर तिथे तुम्ही पीएम मोदींपासून ते नेहरूंपर्यंत सर्वांसोबत फिरू शकता आणि त्यांच्या सोबत फोटो ही काढू शकता. आता हे कसं शक्य आहे? तर या संग्रहालयाच पूर्वीच नाव होतं नेहरू संग्रहालय, पण आता त्याचं नाव बदलून पंतप्रधान संग्रहालय असं करण्यात आलं आहे.

PM Museum
Car Loan Tips : या गोष्टींचा विचार करा मगच कार लोन घ्या, नंतर पश्चाताप होणार नाही!

इथे पंतप्रधान मोदींपासून आतापर्यंत देशातील सर्व 14 पंतप्रधानांची गॅलरी बनवण्यात आली आहे. प्रत्येक पंतप्रधानांसाठी एक स्वतंत्र दालन तयार करण्यात आलं आहे, जिथे तुम्ही त्यांच्या कार्यकाळातील कामगिरी जाणून घेऊ शकता. प्रत्येक दालन नवीन तंत्रज्ञानाने पुन्हा तयार करण्यात आलंय. येथे तंत्रज्ञानाच्या मदतीने भारताचा इतिहास आणि वर्तमान जाणून घेता येईल. देशाचा आत्तापर्यंतचा संघर्ष आणि विकास बघता आणि समजून घेता येईल.

PM Museum
Vastu Tips For Washroom : तुमच्या घरातही अटॅच्ड टॉयलेट, बाथरूम आहे का? शास्त्रातले हे नियम फॉलो करा, नाहीतर...

भारताचा भूतकाळ पाहू शकतो

संग्रहालयात एक टाईम मशीन देखील आहे, जिथे आपण देशाचा इतिहास जाणून घेण्यासाठी भूतकाळात प्रवास करू शकता. इथे कायनेटिक एलईडी लाईट्सने तिरंगा बनवण्यात आला आहे. तसेच इथे एक हँडरायटिंग रोबोटिक मशीन देखील आहे, जे कोणत्याही पंतप्रधानांची सही देऊ शकते.

PM Museum
Vastu Tips For Washroom : तुमच्या घरातही अटॅच्ड टॉयलेट, बाथरूम आहे का? शास्त्रातले हे नियम फॉलो करा, नाहीतर...

भारताचे भविष्य पाहू शकतो

एवढेच नाही तर पीएम म्युझियममध्ये 60 हेलिकॉप्टर राइड झोन देखील आहे, जिथे तुम्ही भारताचे भविष्य अनुभवू शकता. राइड दरम्यान तुम्हाला भारताचे भविष्य दाखवले जाईल. पीएम मोदींसह 14 पंतप्रधानांसोबत फिरून तुम्ही व्हिडिओही बनवू शकता.

PM Museum
Vastu Tips: मुलांनी यशाचं उच्च शिखर गाठावं असं वाटतं असेल तर पालकांनो घरात हा बदल कराच!

पीएम म्युझियमचे वैशिष्ट्य

देशाच्या संसदेबद्दल आणि तिथल्या कामाबद्दल तुम्हाला माहिती मिळेल.

देशाच्या फाळणीबद्दल अधिक देशांना माहिती मिळू शकेल.

देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू यांची शयनकक्ष आणि बैठकीची खोली पाहू शकतो.

तुम्ही आजपर्यंत सर्व पंतप्रधानांना मिळालेल्या प्रसिद्ध भेटवस्तू देखील पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.