PM Narendra Modi: पंतप्रधानांनी केली बायो फ्युअल अलायन्सची घोषणा; काय आहे ही योजना? जाणून घ्या सविस्तर

जैवइंधनाच्या उत्पन्नामध्ये सध्या भारताचा वाटा ३ टक्के आहे.
pm narendra modi
pm narendra modi esakal
Updated on

G-20 चे अध्यक्षपद असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायो फ्युएल अलायन्सची घोषणा केली आहे.काय आहे ग्लोबल बायो फ्युएल अलायन्स? याचं उद्दिष्ट काय आहे?

याबद्दल एनडीटीव्हीने सविस्तर माहिती दिली आहे. सात G20 देश आणि भारत, अमेरिका, इटली, ब्राझील आणि संयुक्त अरब अमिरातीसह चार आमंत्रित देशांनी मिळून ही बायो फ्युएल अलायन्स सुरू केली आहे. जगभरात कार्बन-आधारित इंधनाचा वापर कमी करणे आणि इथेनॉलसारख्या जैवइंधनाचा वापर वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

pm narendra modi
G-20 Summit in India: २४ तास सक्रीय पण कोणालाही दिसत नाहीत; जी २० ची सर्वात सतर्क सुरक्षा व्यवस्था HIT बद्दल जाणून घ्या...

भारताने २०२५-२६ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळून इंधन पुरवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवलं आहे, जे सध्या १० ते ११ टक्के आहे. २० टक्के इथेनॉल मिश्रित इंधन काही शहरांमध्ये उपलब्ध असलं तरी ते संपूर्ण देशात उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आहे.

pm narendra modi
G20 Summit India : G-20 परिषदेच्या थेट प्रक्षेपणाची जबाबदारी 'या' मराठमोळ्या युवकावर; भारतानं टाकला विश्वास!

या दृष्टिकोनातून, ही युती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण भारताला या क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यात आणि सर्वसमावेशक सहकार्य निर्माण करण्यात मदत होईल. जगातील ८० टक्के जैवइंधन अमेरिका, ब्राझील आणि भारतात तयार होते. जगातील ५० टक्के जैवइंधन अमेरिका तयार करते.

ब्राझीलमध्ये ३० टक्के उत्पादन होते, तर भारताचा वाटा सध्या ३ टक्के आहे. उत्पादनाबरोबरच ८० टक्के वापरही या तीन देशांमध्ये होतो. भारत लवकरच जैवइंधनाचा मोठा उत्पादक आणि ग्राहक बनणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.