PM Modi Birthday: मोदी सरकारच्या ७ महत्वाच्या योजना अन् भाजप थेट घराघरात पोहोचलं

लोककल्याणाच्या 'या' सात योजनांचा कोट्यावधी जनतेला झाला लाभ
7 important schemes started by modi government
7 important schemes started by modi government esakal
Updated on

नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत सात महत्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे मोदी सरकार आज घराघरात पोहोचलं आहे. जाणून घेऊया मोदीं सरकारनेमार्फत लोककल्याणासाठी सुरू करण्यात आलेल्या ७ महत्वाच्या योजना. गुजरातच्या राजकारणातून केंद्राच्या राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर मोदींनी या महत्वाच्या योजना सुरू केल्या आहेत.

1) मोफत रेशन योजना

कोरोना काळात म्हणजेच २०२० मध्ये 'पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना' (PMGKAY) ची घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा मुख्य हेतू कोरोनाकाळात भारताला सशक्त ठेवत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना मोफत राशन उपलब्ध करून देणे हा होता. ही योजना ठराविक कालावधीसाठी होती. मात्र आता सरकारने ही योजना पुन्हा एकदा सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत 80 कोटी शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला प्रत्येक सदस्याला 5 किलो अन्नधान्य (गहू किंवा तांदूळ) दिले जाते.

2) प्रधानमंत्री उज्वल योजना

'प्रधानमंत्री उज्वल योजना' ही मोदी सरकारमधील बहुचर्चित योजनेपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. मोदींनी १ मे २०१६ मध्ये ही योजना सुरू केली. योजनेच्या प्रारंभाच्या वर्षात 1.5 कोटी कनेक्शन देण्याची योजना आखण्यात आली होती, परंतु 2.2 कोटी लोकांनी कनेक्शन घेतले. या योजनेअंतर्गत मार्च 2020 पर्यंत वंचित कुटुंबांना 8 कोटी एलपीजी कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, जे 7 सप्टेंबर 2019 रोजी पूर्ण करण्यात आले.

7 important schemes started by modi government
Narendra Modi : PM मोदींना वाढदिवसानिमित्त तुम्हीही 'शुभेच्छा' पाठवू शकता; फक्त 'हे' काम करावं लागेल

3) आयुष्यात भारत योजना

केंद्रीय अर्थसंकल्प 2018 मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती, देशात एक लाख आरोग्य केंद्रे उभारणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (BPL धारक) वार्षिक 5 लाख रुपयांच्या आरोग्य विमा संरक्षणासह जोडणे हा या योजनेचा मुख्य हेतू होता.

4) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

२०१९ मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी बांधवांना सहा हजार रुपयांची वार्षिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ कुटुंबातील पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांनाच घेता येतो. यासाठी शासनाकडून जाहीर होणारा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. डिसेंबर ते मार्च 2021-22 दरम्यान 11,11,96,895 लोकांना पैसे देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

7 important schemes started by modi government
PM Modi Birthday : पंतप्रधानांच्या वस्तू तुम्हाला हव्यात? असे व्हा लिलावात सहभागी

5) हर घर जल योजना

२०२० -२१ च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. देशातील सर्व घरांमध्ये पाइपलाइनद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणे हा या योजनेचा उद्देश आहे. हे लक्ष्य 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या योजनेवर सरकार 3.5 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. या योजनेमुळे लोकांना घरपोच पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल

7 important schemes started by modi government
PM Modi Lifestyle: 72 वर्षाच्या वयातही पीएम मोदी आहेत अगदी फिट; काय आहे त्यांचं फिटनेस सिक्रेट?

6) मोफत लसीकरण योजना

कोरोनाच्या महामारीमध्ये जेथे लाखो लोक त्यांचे रोजगार गमावून बसले होते तेथे मोदींनी घोषित केलेल्या या योजनेने जनतेला मोठा दिलासा मिळाला होता. देशात लसीचा तुटवडा दूर करत कोट्यावधी जनतेस मोफत लस देण्यात आली.

7) स्टार्टअप इंडिया

मोदींना राबवलेल्या स्टार्टअप इंडिया योजनेचे जगभऱ्यात कौतुक करण्यात आले होते. २०१४ मध्ये देशात केवळ ३०० ते ४०० स्टार्टअप होते आता त्यांची संख्या तब्बल सत्तर हजारांच्या घरात पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.