''मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गणेशदर्शनासाठी गेल्याने जणूकाही आकाश फाटल्यासारखे वातावरण तयार केले जात आहे.''
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dr. Dhananjay Chandrachud) यांच्या घरी जाऊन श्रीगणेशाची पूजा केल्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. पंतप्रधानांनी बुधवारी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन पूजा केल्याने न्यायपालिकेच्या स्वतंत्रतेवर प्रश्न चिन्ह उमटले असून याबद्दल सरन्यायाधीशांच्या कृतीचा सर्वोच्च न्यायालय बार असोशिएशनने (एससीबीए) निषेध व्यक्त करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.