Lok Sabha Election 2024 Latest News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. ही पाहिली यादी जाहीर करताना पक्षाचे नेते विनोद तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०२४ लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशमधील वाराणसीतून येथून लढणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच यावेळी भाजपच्या १९५ उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहे. (BJP First List Of Lok sabha Election Candidates)
यासोबतच भाजपकडून १६ राज्य आणि २ केंद्र शासीत प्रदेशांमधील तब्बल १९५ जागांचा निर्णय झाला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. यामध्ये पंतप्रधान मोदी हे वाराणसी येथून निवडणूक लढवणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत ३४ केंद्रीय व राज्य मंत्री हे निवडणूक लढवणार आहेत.
एक लोकसभा अध्यक्ष आणि दोन माजी मुख्यमंत्री यांची नावे देखील १९५ उमेदवारांमध्ये आहेत. तसेच यामध्ये २८ महिलांचा समावेश आहे. ५० पेक्षा कमी वय असलेले ४७ युवा उमेदवार असणार आहेत. तसेच या यादीमध्ये अनुसूचित जाती २७, अनुसूचित जमाती १८, ओबीसी ५७ उमेदवार असणार आहेत, अशा प्रकारे समाजातील सर्व वर्गांना उमेदवारी देताना पहिल्या यादीत प्रतिनीधीत्व देण्यात आल्याचे देखील यावेळी भाजपकडून सांगण्यात आले.
पहिल्या यादीत ज्या राज्यांचा विचार झाला आहे ती यादी यावेळी सांगण्यात आली. यामध्ये पुढील प्रमाणे जागांची घोषणा करण्यात आली. (BJP Lok Sabha Candidates First List)
उत्तर प्रदेश- ५१
पश्चिम बंगाल - २०
मध्य प्रदेश – २४
गुजरात – १५
राजस्थान – १५
केरळ – १२
तेलंगणा – ९
आसाम – ११ (एकूण जागा १४)
झारखंड – ११
छत्तीसगड – ११
दिल्ली – ५
जम्मू – काश्मीर – २
उत्तराखंड – ३
अरुणचाल प्रदेश – २
गोवा – १
त्रिपुरा – १
अंदमान – निकोबार – १
दीव आणि दमण -१
भाजपने जाहीर केलेली उमेदवारांची पहिली यादी पुढीलप्रमाणे :
उत्तर प्रदेश
वाराणसी: पीएम नरेंद्र मोदी
कैराना: प्रदीप कुमार
मुजफ्फरनगर: डॉ. संजीव कुमार बालियान
नगीना: ओम कुमार
रामपूर: घनश्याम लोधी
संभल: परमेश्वर सैनी
अमरोहा: कंवर सिंह तंवर
नोएडा: डॉ. महेश शर्मा
बुलंदशहर: भोला सिंह
मथुरा: हेमा मालिनी
आग्रा: सत्यपाल सिंह बघेल
फतेहपुर सिक्री: राजकुमार चाहर
एटा: राजवीर सिंह राजू भैय्या
आंवला: धर्मेंद्र कश्यप
शाहजहांपुर: अरुण कुमार सागर
खीरी: अजय मिश्रा टेनी
धौहरा: रेखा वर्मा
सीतापूर: राजेश वर्मा
हरदोई: जय प्रकाश रावत
मिश्रिख: अशोक कुमार रावत
उन्नाव: साक्षी महाराज
मोहनलालगंज: कौशल किशोर
लखनऊ: राजनाथ सिंह
अमेठी: स्मृती इराणी
प्रतापगढ़: संगमलाल गुप्ता
फर्रुखाबाद: मुकेश राजपूत
इटावा: राम शंकर कठेरिया
कन्नौज: सुब्रत पाठक
अकबरपुर: देवेंद्र सिंह भोले
जालौन: भानू प्रताप सिंह
झांसी: अनुराग शर्मा
हमीरपुर: कुंवर पुष्पेंद्र सिंह चंदेल
बांदा: आरके सिंह पटेल
फतेहपूर: साध्वी निरंजन ज्योती
बाराबंकी: उपेंद्र रावत
फैजाबाद: लल्लू सिंह
आंबेडकर नगर: रितेश पांडे
श्रावस्ती: साकेत मिश्रा
डुमरियागंज: जगदंबिका पाल
गोंडा: कीर्तीवर्धन राजा भैय्या
बस्ती: अरविंद द्विवेदी
महाराजगंज: पंकज चौधरी
गोरखपूर: रवि किशन
कुशीनगर: विजय कुमार दुबे
बासगांव: कमलेश पासवान
लालगंज: श्रीमती नीलम सोनकर
आजमगढ़: दिनेश लाल यादव निरहुआ
सलेमपुर: रवींद्र कुशवाह
जौनपुर: कृपा शंकर सिंह
चंदौली: महेंद्र नाथ पांडेय
दिल्ली
चांदनी चौक: प्रवीण खंडेलवाल
उत्तर-पूर्व दिल्ली: मनोज तिवारी
नई दिल्ली: बांसुरी स्वराज
पश्चिम दिल्ली: कमलजीत सहरावत
दक्षिण दिल्ली: रामवीर सिंह बिधूडी
मध्य प्रदेश
मुरैना: शिवमंगल सिंह तोमर
भिंड: नंबर राय
ग्वाल्हेर: भरत सिंह कुशवाह
गुना: ज्योतिरादित्य सिंधिया
सागर: लता वानखेडे
टीकमगड: वीरेंद्र खटीक
दमोह: राहुल लोधी
खजुराहो: वीडी शर्मा
सतना: गणेश सिंह
देवास: मदेंद्र सिंह सोलंकी
मंदसौर: सुधीर गुप्ता
रतलाम: अनिता नगर सिंह चौहान
खरगोन: गजेंद्र पटेल
खंडवा : ज्ञानेश्वर पाटील
बैतूल : दुर्गादास उईके
अंदमान आणि निकोबार बेटे
अंदमान आणि निकोबार बेटे : विष्णू पद रे
अरुणाचल प्रदेश
अरुणाचल पश्चिम: किरण रिजिजू
अरुणाचल पूर्व: तापिर गाओ
आसाम
करीमगंज: कृपानाथ मल्लाह
सिलचर: परिमल सुकलाबैद्य
स्वायत्त जिल्हा: अमर सिंह तिस्सो
गुवाहाटी: बिजुली कलिता मेधी
मंगलदोई: दिलीप सैकिया
तेजपूर: रणजीत दत्ता
नागाव: सुरेश बोरा
कालियाबोर: कामाख्या प्रसाद तासा
जोरहाट: टोपन कुमार गोगोई
दिब्रुगढ: सर्बानंद सोनोवाल
लखीमपुर: प्रधान बरुआ
छत्तीसगड
सरगुजा: चिंतामणी महाराज
रायगड: राधेश्याम रथिया
जांजगीर-चंपा: कमलेश जांगडे
कोरबा: सरोज पांडे
बिलासपूर: तोखन साहू
राजनांदगाव: संतोष पांडे
दुर्ग: विजय बघेल
रायपूर: ब्रिजमोहन अग्रवाल
महासमूद: रूप कुमारी चौधरी
बस्तर: महेश कश्यप
कांकेर: भोजराज नाग
दादर व नगर हवेली तसेच दीव आणि दमण
दमण आणि दीव - लालुभाई पटेल
गोवा
उत्तर गोवा - श्रीपाद योस्सो नाईक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.