अशोक स्तंभाचं बांधकाम करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी विचारले 'हे' 5 मजेशीर प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या इमारतीवर, 20 फूट उंच अशा अशोक स्तंभाचं अनावरण केलंय.
Narendra Modi Latest Marathi News, PM Narendra Modi News
Narendra Modi Latest Marathi News, PM Narendra Modi Newsesakal
Updated on

नवी दिल्ली : देशात नव्या संसद भवनाचं काम वेगात सुरू आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नवीन संसद भवनाच्या इमारतीवर, 20 फूट उंच अशा अशोक स्तंभाचं (National Emblem) अनावरण केलं. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला (Om Birla) देखील उपस्थित होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी सुरू असलेल्या या कामाचा आढावाही घेतला. स्तंभाचं अनावरण केल्यानंतर, मोदींनी हा स्तंभ बांधणाऱ्या कामगारांशी संवादही साधला.(Narendra Modi Latest Marathi News)

प्रश्न क्रमांक 1- पीएम मोदींनी मजुरांना विचारलं की, आपण इतिहास घडवत आहात असं तुम्हाला वाटतं?

मजुरांचं उत्तर : होय, आम्ही इतिहास घडवत आहोत. लोकशाहीचं मंदिर उभारत आहोत.

प्रश्न क्रमांक 2 - अशोकस्तंभ बांधताना आणि घर बांधताना तुम्हाला काय फरक जाणवतो?

मजुरांचं उत्तर : सर, आम्हा अभिमान वाटतोय.

Narendra Modi Latest Marathi News, PM Narendra Modi News
कन्हैया लालच्या हत्येनंतर RSS आक्रमक; मुस्लिम समाजाला दिला 'हा' सल्ला

प्रश्न क्रमांक 3 - आम्ही इथं आलो, तेव्हा तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली?

मजुरांचं उत्तर : भगवान श्रीराम शबरी मातेच्या झोपडीत गेले होते, त्याच मार्गानं तुम्ही आमच्या झोपडीत आला आहात. हे ऐकून पीएम मोदी म्हणाले, वाह-वाह! ही तुमची झोपडीच आहे. त्यानंतर सगळे हसायला लागले. पंतप्रधान म्हणाले, 'देशातील प्रत्येक गरीबाला ही आपली झोपडी आहे, असं वाटलं पाहिजे.'

Narendra Modi Latest Marathi News, PM Narendra Modi News
VIDEO : दाजींचा नादच खुळा; दमलेल्या वारकऱ्यांसाठी दानवेंनी स्वत: बनवला चहा

प्रश्न क्रमांक 4 - तुमच्यापैकी कुणाला कोरोनाची समस्या आहे का?

मजुरांचं उत्तर : नाही सर, आम्हाला कोणतीही अडचण आली नाही. आम्हाला लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. दरम्यान, एक व्यक्ती म्हणाली- सर, मला बूस्टर डोसही मिळाला आहे. यावर पीएम म्हणाले, तुम्ही खूप जागरूक आहात.

प्रश्न क्रमांक 5 - पंतप्रधान मोदींनी विचारलं तुम्हाला सरकारी रेशन मिळतं की नाही?

मजुरांचं उत्तर : होय सर, आम्हाला समान रेशन मिळतं. तुम्ही इथं आल्यामुळं आम्ही आता अधिक उत्साहानं काम करू. यावर पीएम म्हणाले- 'नाही, तुम्ही आमचा उत्साह वाढवला आहे. तुम्ही वेळेवर काम केलेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.