‘शॉर्टकट’च्या राजकारणातून विकास होत नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशातील जनतेने ‘शॉर्टकट’च्या राजकारणापासून दूर राहायला हवे कारण अशाप्रकारचे राजकारणी हे कधीही नवी विमानतळे, महामार्ग बनवू शकत नाही.
PM Narendra Modi criticize Development does not happen through shortcut politics
PM Narendra Modi criticize Development does not happen through shortcut politics sakal
Updated on

रांची : देशातील जनतेने ‘शॉर्टकट’च्या राजकारणापासून दूर राहायला हवे कारण अशाप्रकारचे राजकारणी हे कधीही नवी विमानतळे, महामार्ग बनवू शकत नाही. ही मंडळी कधीही ‘एम्स’ची उभारणी करणार नाहीत किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी देखील मेहनत घेणार नाहीत, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सभेत बोलताना केली.

ज्या देशाचे राजकारण हे शॉर्टकटवर आधारित असते त्यांना फारशी मेहनत घ्यावी लागत नाही तसेच पुढील परिणामांचा विचार करण्याचीही गरज भासत नाही. ‘शॉर्टकट’च्या राजकारणाने कधीतरी ‘शॉर्टसर्किट’ होणारच. आम्हाला अशा प्रकारचा शॉर्टकट अवलंबिणाऱ्या राजकारणापासून दूर राहायला हवे, असेही मोदी म्हणाले. झारखंड दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते १६ हजार ८०० कोटींच्या विकासकामांचे उद्‍घाटनही करण्यात आले. दरम्यान, देवघर येथे आयोजित रोड शोमध्येही पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. बारा किलोमीटर लांबीच्या रोड शोसाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोदी यांनी वैद्यनाथ मंदिरालाही भेट देत पूजाअर्चा केली.

गॅस पुरवठ्याची केवळ कल्पना

याआधी पाइपमधून गॅस पुरवठ्याची केवळ कल्पनाच करण्यात आली होती. पण ती आता प्रत्यक्षात आलेली नाही. झारखंड याबाबतीत आघाडीवर आहे. झारखंडला उद्योगाच्या क्षेत्रामध्ये अग्रणी राज्य होण्याची संधी आहे. सध्या येथे कनेक्टिव्हिटी वाढविण्याचे काम सुरू आहे. झारखंडला समुद्राच्या मार्गाने जोडण्याचे काम देखील सुरू आहे. यामुळे राज्यातील उद्योग वाढतील आणि स्थानिक आदिवासींना देखील रोजगार मिळू शकेल, अशा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.