Modi Ka Pariwar : भाजप नेते म्हणतायत 'मोदी का परिवार', पण पंतप्रधान मोदींच्या खऱ्या कुटुंबात नेमकं कोण-कोण? जाणून घ्या

PM Narendra Modi Family tree : येत्या काही दिवसात लोकसभा निवडणूकांची घोषणा केली जाऊ शकते. यापूर्वी देशात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
PM Narendra Modi Family tree  Modi Ka Pariwar Controversy marathi political news
PM Narendra Modi Family tree Modi Ka Pariwar Controversy marathi political news
Updated on

PM Narendra Modi Family tree : येत्या काही दिवसात लोकसभा निवडणूकांची घोषणा केली जाऊ शकते. यापूर्वी देशात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने सोमवारपासून नवीन मोहिम हाती घेतली असून यामध्ये सर्व केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्वीटर) च्या बायोमध्ये 'मोदी का परिवार' असा उल्लेख करताना दिसत आहेत.

बिहारचे माजी माजी मुख्यमंत्री लालू यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका केली होती. लालू यादव यांनी एका रॅलीमध्ये मोदींकडं त्यांचं कुटुंब नसल्याचा वक्तव्य केलं होतं. याला प्रत्युत्तर देताना पीएम मोदी यांनी देशातील १४० कोटी नागरीक माझा परिवार असल्याचे म्हटले होते. याला उत्तर देत भाजपने मोदी का परिवार ही मोहिम सुरू केली होती.

मात्र तुम्हाला माहिती आहे का की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खऱ्या कुटुंबात नेमकं कोण-कोण आहे? मीडिया रिपोर्टनुसार, पीएम नरेंद्र मोदी यांचे वडिल दामोदरदास मूलचंद मोदी आणि आई हीरा बा यांना सहा मुलं झाली. पंतप्रधान मोदी हे त्यांचे तिसऱ्या क्रमांकाचे आपत्य आहेत. तर त्यांची दुसरी भावंडे सोमभाई, अमृतभाई, प्रल्हादभाई, वासंतीबेन आणि पंकजभाई हे आहेत. बासंतीबेन या पीएम मोदी यांच्या एकुलत्या एक बहिण आहेत.

PM Narendra Modi Family tree  Modi Ka Pariwar Controversy marathi political news
Amit Shah Jalgaon: मोदींचे 10 वर्ष जाऊ द्या तुमच्या 50 पैकी 5 वर्षाचा हिशोब द्या; पवारांवर अमित शाह यांचा पलटवार

कोण काय करतं?

पंतप्रधान मोदींचे सर्वात मोठे बंधू सोमभाई हे गुजरातच्या वडनगर येथे एक वृद्धाश्रम चालवतात. तर त्यांचे लहान भाऊ पंकजभाई मोदी गुजरात माहिती विभागात ऑफिसर आहेत. पंकजभाई यांच्यासोबत त्यांची आई हीराबा देखील राहतात. पंतप्रधान मोदी यांचे वडिल चहाचे दुकान चालवायचे. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनण्यापूर्वी १२ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा देखील त्यांचं कुटुंब सामान्य जीवन जगत होतं.

नरेंद्र मोदींचे दुसरे मोठे बंधू अमृतभाई मोदी अहमदाबादमध्ये मुलगा संजय सोबत राहातता. ते प्रायव्हेट कंपनीतून निवृत्त झाले आहेत. तर संजय हे घराजवळ स्पेअर पार्ट्सचं छोटंसं दुकान चालवतात.

पीएम मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी हे अहमदाबाद मध्ये राशन दुकान चालवतात. तर त्यांची बहिण वासंतीबेन यांचं हसमुखभाई यांच्याशी लग्न झालं आहे. ते एलआयसीमध्ये काम करत होते.

PM Narendra Modi Family tree  Modi Ka Pariwar Controversy marathi political news
Shahbaz Nadeem News : शेवटच्या कसोटीआधी 500 विकेट घेणाऱ्या टीम इंडियाच्या स्पिनरने अचानक घेतली निवृत्ती!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.