Independence Day : पंतप्रधान मोदींनी केले दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

लाल किल्लल्यावरून ते देशवासियांना संबोधित करत आहेत.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSakal
Updated on

नवी दिल्ली : आज देशभरात भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले आहे. ध्वजारोहणानंतर ते देशाला संबोधित करत आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अमित शाह, जे. पी. नड्डा, निर्मला सितारमण, राजनाथ सिंह यांसहित अनेक मंत्री उपस्थित आहेत.

देशाला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदी यांनी, "देशाच्या स्वातंत्र्यात सर्वांचं योगदान आहे, कित्येक वर्षांच्या गुलामीच्या जोखडातून भारत आज मुक्त झालाय. सध्याच्या भारताच्या सामर्थ्यावर जगाला विश्वास आहे. या कालखंडाचा पुढचे एक हजार वर्षे प्रभाव पडेल. त्याचबरोबर आम्ही मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणार आहोत" अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

PM Narendra Modi
Independence Day in Kashmir : श्रीनगर येथील लाल चौकात नागरिकांनी फडकवले तिरंगा ध्वज

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

आता आपल्याला थांबायचं नाही, द्विधा अवस्थेतही राहायचं नाही. सध्याचा कालखंड पुढच्या एक हजार वर्षांची दिशा ठरवणार आहे. स्टार्टअप, तंत्रज्ञानात भारताचा जगात डंका वाजत आहे. स्टार्टअपमध्ये भारत जगात प्रथम आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

यावेळी त्यांनी मणिपूच्या मुद्द्यावर भाष्य केलं असून तेथील हिंसाचार कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे, मणिपूरच्या नागरिकांनी शांतता राखावी, सरकार मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करेल असं मोदी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()