ममतांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) सतत टीका करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी एक मोठं वक्तव्य केलंय, त्यामुळं त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या दुरुपयोगामागं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात असावा असं मला वाटत नाही, असं ममता यांनी म्हटलंय.
भाजपमधल्या (BJP) नेत्यांचा एक गट आहे, जो आपलं हित साधण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा (Central Investigation Agency) दुरुपयोग करत आहे. अनेकांना माहिती नाही की सीबीआय आता पंतप्रधान कार्यालयाच्या कक्षेत नाही तर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कक्षेत येते’ असं ममतांनी म्हणत आपला रोख केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडं असल्याचं सूचित केलं.
मात्र, ममतांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभेत केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या विरोधात एक प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाच्या बाजूनं 189 मतं पडली, तर विरोधात 69 मतं पडली. या प्रस्तावानंतर बोलत असताना ममता यांनी म्हटलं की, ‘भाजप नेत्यांकडून दररोज विरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडी, सीबीआयची (ED, CBI) भीती दाखवली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी असं काम करणं योग्य आहे का ? मला वाटत नाही की यामागं पंतप्रधान मोदी आहेत. मात्र, काही भाजपचे नेते आहेत जे आपल्या स्वार्थासाठी सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करत आहेत.’
पूर्वी सीबीआय ही पंतप्रधान कार्यालयाला उत्तरदायी होती. मात्र, आता ती केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहे, असं सांगत त्यांनी गृहमंत्री अमित शाहांना लक्ष केलं. यापूर्वी ममतांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही (RSS) कौतुक करून खळबळ उडवून दिली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.