VIDEO: मोदी-शहांसोबत सोनिया गांधी; अधिवेशनानंतर विरोधक-सत्ताधारी दिसले एकत्र

VIDEO: मोदी-शहांसोबत सोनिया गांधी; अधिवेशनानंतर विरोधक-सत्ताधारी दिसले एकत्र
Updated on

नवी दिल्ली : संसदेच्या मॉन्सून सत्रामध्ये सरकार आणि विरोधकांच्या दरम्यान मोठा तणाव पहायला मिळाला. संसदेचं बहुतांश कामकाज हे गोंधळातच पार पडलं. ओबीसी विधेयक वगळता सरकारला विरोधकांकडून इतर कोणत्याच मुद्यावर समर्थन मिळाल्याचं दिसून आलं नाही. बुधवारी मॉन्सून सत्राच्या समारोपाला विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. लोकसभेचं सत्र अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधील ज्येष्ठ नेते लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी गेले.

VIDEO: मोदी-शहांसोबत सोनिया गांधी; अधिवेशनानंतर विरोधक-सत्ताधारी दिसले एकत्र
तालिबान्यांचा आणखी तीन अफगाणी प्रांत राजधान्यांवर कब्जा
VIDEO: मोदी-शहांसोबत सोनिया गांधी; अधिवेशनानंतर विरोधक-सत्ताधारी दिसले एकत्र
मोदींची लोकप्रियता उतरणीला लागलीय - हरी नरके

एका खोलीमध्ये लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी, तृणमूल काँग्रेस, शिरोमणी अकाली दल, वायएसआरसीपी, बीजेडीचे खासदार दिसून आले. संसदेचं सगळं अधिवेशन एकीकडे पेगॅससच्या मुद्यावरुन गोंधळात गेलेलं असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांचं हे सुखद मनोमिलन दिसून आलं. मॉन्सून सत्रामध्ये तृणमूलचे खासदार शांतनु सेन यांचं देखील निलंबन झालं होतं.

VIDEO: मोदी-शहांसोबत सोनिया गांधी; अधिवेशनानंतर विरोधक-सत्ताधारी दिसले एकत्र
दिल्लीतील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार - केजरीवाल

यावेळचं हे पावसाळी अधिवेशन पेगॅसस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी झालेल्या गदारोळासाठी ओळखलं जाईल. या मॉन्सून सत्राची सुरुवात १९ जुलै रोजी झाली. सत्राची सुरुवातच विरोधकांच्या पेगॅसस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठीच्या गोंधळाने झाली. अनेकदा या गोंधळामुळे संसदेचं कामकाज स्थगित करावं लागलं. विरोधकांना या प्रकरणावर चर्चा हवी आहे तसेच या सगळ्या प्रकरणाच्या तपासासाठी जेपीसीची मागणी केली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.