PM Modi Yoga : योगदिनाच्या आधीच आला पंतप्रधान मोदींचा खास Video; आसनांचे दाखवले प्रात्यक्षिक

मोदी यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
PM Modi Yoga
PM Modi YogaSakal

दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आधीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाच्या संदर्भातील व्हीएफएक्सद्वारे तयार केलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी "शरीर आणि मन निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी योग महत्त्वाचं काम करतो" असा संदेश या व्हिडिओतून दिला आहे.

PM Modi Yoga
Viral Video : भर लग्नात नवरीचा बॉयफ्रेंड आला अन् भरलं भांगेत कुंकू; नवरदेव कोमात

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर असतानाच 21 जून रोजी न्युयार्क येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे नेतृत्व करणार आहेत. या समारंभात संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) अध्यक्षा साबा कोरोसीही सहभागी होणार आहेत. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मी उत्साहित आहे." असं अध्यक्षा साबा कोरोसी म्हणाल्या आहेत.

साबा कोरोसी यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी लिहिले की, “संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभात तुम्हाला भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. तुमचा सहभागामुळे हा कार्यक्रम आणखी खास बनेल. शरीर आणि मनाने निरोगी आणि आनंदी राहण्याच्या दिशेने योग जगाला एकत्र आणतो. योग जागतिक स्तरावर अधिक लोकप्रिय झाला आहे." असं लिहित त्यांनी विविध आसनांचे चित्रण करणारा व्हिडिओही शेअर केला आहे.

ते पुढे म्हणाले, “योगाचा शरीर आणि मन दोन्हीसाठी खूप फायदा होतो. योगा हे सामर्थ्य, लवचिकता आणि शांतता वाढवते. चला, योगाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवूया आणि शरीर, मनाने निरोगी आणि आनंदी राहू या."

PM Modi Yoga
Crime : फोन हिसकावून घेतल्याचा राग; बायकोने झोपलेल्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर टाकलं उकळतं तेल

दरम्यान, पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा न्यूयॉर्कमध्ये सुरू होईल, जिथे ते 21 जून रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com