पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी देवाचं वरदान आहेत : शिवराज सिंह चौहान

Narendra Modi Shivraj Singh Chouhan
Narendra Modi Shivraj Singh Chouhanesakal
Updated on
Summary

'पंतप्रधान मोदी हे महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा त्रिवेणी संगम आहेत.'

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) महात्मा गांधी (Mahatma Gandhi), सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा 'त्रिवेणी संगम' असं वर्णन केलंय. यासोबतच त्यांनी पीएम मोदींना 'भारतासाठी देवाचं वरदान' असंही संबोधलंय.

भोपाळमधील (Bhopal Madhya Pradesh) गरीब कल्याण संमेलनाला संबोधित करताना चौहान म्हणाले, एका महान नेत्याची दुसऱ्या महान नेत्याशी तुलना करणं योग्य नाही. मात्र, जर तुम्हाला ते करायचंच असेल तर फक्त गांधीजीच नाही तर नरेंद्र मोदींमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) आहेत. त्यांच्यात मला 'त्रिवेणी संगम' दिसतो. गांधीजींप्रमाणंच मोदीजींनी हातात झाडू घेऊन लोकांना स्वच्छतेशी जोडलं, तर पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये 'सर्जिकल स्ट्राइक' (Surgical Strike Pakistan) करण्याचं काम मोदींनी बोस यांच्यासारखं केलं. देशाच्या एकात्मतेसाठी मोदींनी कलम 370 रद्द करून काश्मीर पूर्णपणे भारताशी जोडलं. जी एकात्मता सरदार पटेल यांच्यात होती, असंही त्यांनी नमूद केलंय.

Narendra Modi Shivraj Singh Chouhan
ठरलं! आझमगडमधून डिंपल यादवांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब

मोदींइतका कोणताही पंतप्रधान ईशान्येकडं गेला नाही, असा दावा चौहान यांनी केलाय. मोदींनी तेथील फुटीरतावादाचा अंत केला. चौहान यांनी मोदींचं वर्णन 'भारतासाठी देवाचं वरदान' आणि 'डायनॅमिक विचारांचा माणूस' असं केलंय. ते पुढं म्हणाले, मोदीजींच्या नेतृत्वाखाली वैभवशाली, शक्तिशाली, समृद्ध भारताची निर्मिती होत आहे. मोदी हे नव्या भारताचे शिल्पकार आहेत. शिवाय, मोदींनी देशाच्या राजकारणाचा अजेंडा इतका बदलून टाकलाय की, काँग्रेसलाही (Congress) निवडणुकीसाठी एक कुटुंब एक तिकीट हा निकष अंगीकारणं भाग पडलंय आणि हे फक्त मोदीच करू शकतात, असं त्यांनी कौतुक केलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()