PM Modi: ...म्हणून PM मोदी दरवर्षी कारगिलमध्ये सैनिकांसोबत साजरी करतात दिवाळी!

पंतप्रधान मोदी करगिलमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत
PM Narendra Modi
PM Narendra ModiEsakal
Updated on

दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात दुर्गम भाग असलेल्या कारगिलमध्ये गेले आहेत. पंतप्रधान मोदी करगिलमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी गेल्या 8 वर्षांपासून भारतीय लष्करातील जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करत आहेत. 2014 पासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी जात सैनिकांसोबत हा सण साजरा करतात. यावेळी ते कारगिलमध्ये हा सण साजरा करत आहेत.

पंतप्रधान या ठिकाणी जावून दिवाळी साजरी करण्याचं कारण म्हणजे, कारगिल हे भारतातील सर्वात महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्याचबरोबर याच सेक्टरमध्ये 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले होते. या युद्धादरम्यान पीएम मोदी जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपसाठी काम करत होते. त्यांची या जागेशी वेगळीच नाळ जोडलेली आहे. युद्धादरम्यान सैनिकांसोबत एकजूट दाखवण्यासाठी ते मदत साहित्य घेऊन कारगिलला पोहोचले होते.

PM Narendra Modi
Video : युक्रेनमध्ये तिरंगा बनला भारतीयांचं कवच; कारगिलमध्ये PM मोदींनी वाढवले जवानांचे मनोबल

या यात्रेने मला तीर्थयात्रेचा अनुभव दिल्याचे पीएम मोदी म्हणाले होते. 2019 मध्ये त्यांनी ट्विट करताना लिहिले होते की, '1999 च्या कारगिल युद्धादरम्यान त्यांना कारगिलमध्ये जाऊन आपल्या देशाच्या शूर सैनिकांसोबत एकता दाखवण्याची सुवर्ण संधी मिळाली. हा तो काळ होता जेव्हा ते जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात त्यांच्या पक्षासाठी काम करत होते. कारगिलचा प्रवास आणि सैनिकांशी संवाद साधण्याचा अनुभव ते कधीही विसरू शकणार नाही.

PM Narendra Modi
Narendra Modi : "दिवाळी हा दहशतवाद्यांच्या अंताचा..."; मोदी म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.