'100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीशी देश ताकदीने लढतोय'

गेल्या सात वर्षात अशी अनेक कामे सरकारने केली, ज्यामुळे करोडो लोक आनंदी आहेत. देशाला पुढे नेण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा राहिला आहे. पूर्वेकडील राज्यांपासून ते काश्मीरपर्यंतचे अनेक प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविण्यात आले.
mann ki baat
mann ki baatFile photo
Updated on
Summary

गेल्या सात वर्षात अशी अनेक कामे सरकारने केली, ज्यामुळे करोडो लोक आनंदी आहेत. देशाला पुढे नेण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा राहिला आहे. पूर्वेकडील राज्यांपासून ते काश्मीरपर्यंतचे अनेक प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविण्यात आले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओवरून 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित करत असतात. आज मन की बातच्या ७७व्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी यास चक्रीवादळ तसेच कोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांप्रति संवेदना व्यक्त केली. तसेच एनडीए सरकारला केंद्रात सत्तेत येऊन ७ वर्षे पूर्ण झाली, यावरही चर्चा केली. या सात वर्षात जे काही साध्य करता आलं, ते सर्व देशाचं आहे. गेल्या शंभर वर्षात आलेल्या सर्व संकटांचा देशाने मुकाबला केला. आताही सर्वात मोठ्या महामारीचा संपूर्ण देश यशस्वीपणे सामना करतोय, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान बचाव कार्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांचेही मोदींनी आभार मानले. मोदी म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात अनेक नागरिकांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. जेव्हा दुसरी लाट आली, तेव्हा अचानक ऑक्सिजनची मागणी कित्येक पटीने वाढू लागली. वैद्यकीय ऑक्सिजन देशातील विविध भागात पोहचविणे हे एक मोठे आव्हान होते.

mann ki baat
7 Yrs of Modi Govt: डिफेन्स धोरणातील नऊ महत्त्वाचे बदल

त्यानंतर पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळांचाही पंतप्रधान मोदींनी उल्लेख केला. कोरोना काळात तोक्ते, यास चक्रीवादळसारख्या नैसर्गिक आपत्ती आल्या. त्याचाही सामना देशातील नागरिक करत आहेत. या काळात अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली. त्यांच्याप्रति मी संवेदना व्यक्त करतो. अनेक अडचणींचा सामना करत नागरिकांनी दाखवलेलं धैर्य कौतुकास्पद आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी देशात फक्त एक टेस्टिंग लॅब होती. पण आता देशात २ हजार ५०० हून अधिक टेस्टिंग लॅब आहेत. सुरवातीला फक्त १०० टेस्ट होत होत्या. आता या लॅबमध्ये २० लाखाहून अधिक टेस्ट होत आहेत. देशभरातील ३३ कोटीहून अधिक नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

mann ki baat
मोदी सरकारला कोरोनाचा अडथळा

मोदी पुढे म्हणाले की, गेल्या सात वर्षात अशी अनेक कामे सरकारने केली, ज्यामुळे करोडो लोक आनंदी आहेत. देशाला पुढे नेण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा राहिला आहे. पूर्वेकडील राज्यांपासून ते काश्मीरपर्यंतचे अनेक प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविण्यात आले. आता त्याठिकाणी विकासाचा नवा अध्याय लिहला जाईल. एक देश म्हणून काम हाती घेतल्याने हे सर्व शक्य झाले. जी काम कित्येक वर्षांपासून होऊ शकली नाही, ती गेल्या ७ वर्षात झाली आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ऑक्सिजन एक्सप्रेसची लोको पायलट शिरीषासोबत संवाद साधला. यावेळी शिरीषा म्हणाली की, 'मी माझ्या वडिलांकडून प्रेरणा घेतली. आणि कोरोना लढ्यात सहभागी झाले.' कोरोना लढ्यात अनेक माता, बहिणी सहभागी झाल्या आहेत, ही गर्वाची गोष्ट आहे, असे मोदी म्हणाले. एअरफोर्समधील ग्रुप कॅप्टन ए.के.पटनायक यांच्याशी संवाद साधल्यानंतर मोदींनी भारतीय सेनेचेही कौतुक केले.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()