PM Narendra Modi : ''धमकावणे, घाबरवणे, ही काँग्रेसची जुनी संस्कृती'' सहाशे वकिलांच्या पत्राचा संदर्भ देत पंतप्रधानांची टीका

‘एक खास समूह न्यायपालिकेवर दबाव आणू पाहत आहे,’ असा गंभीर आरोप ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे, पिंकी आनंद यांच्यासह सहाशे वकिलांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून केला आहे. या समुहाकडून सुरू असलेल्या कारवाया लोकशाहीच्या दृष्टीने तसेच न्यायिक प्रक्रियेवरील विश्वासाच्या अनुषंगाने धोकादायक आहेत असेही त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modiesakal
Updated on

नवी दिल्लीः ‘एक खास समूह न्यायपालिकेवर दबाव आणू पाहत आहे,’ असा गंभीर आरोप ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे, पिंकी आनंद यांच्यासह सहाशे वकिलांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून केला आहे. या समुहाकडून सुरू असलेल्या कारवाया लोकशाहीच्या दृष्टीने तसेच न्यायिक प्रक्रियेवरील विश्वासाच्या अनुषंगाने धोकादायक आहेत असेही त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान या पत्राचा संदर्भ देत दुसऱ्यांना घाबरविणे, धमकाविणे ही काँग्रेसची जुनी संस्कृती असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

राजकीय नेते तसेच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा लोकांशी संबंधित खटल्यांचे निर्णय प्रभावित करण्याचे काम या समुहाकडून सुरू आहे. न्यायपालिकेच्या तथाकथित सुवर्णयुगाचा गवगवा करत चुकीची माहिती पसरविणे, न्यायालयांच्या कार्यवाहीबद्दल संभ्रम निर्माण करणे आणि जनतेतील न्यायपालिकेबद्दलचा विश्वास कमी करण्याचे काम हा समूह करीत आहे, असा आरोप या तीन पानी पत्रात करण्यात आला आहे.

PM Narendra Modi
Jayant Patil: "जयंत पाटलांपेक्षा गोविंदा चांगला कलाकार"; CM एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

हे सहन करता येणार नाही

राजकीय अजेंड्याच्या आधारे कोर्टाच्या निर्णयांचे कौतुक करणे किंवा त्यावर टीका करण्याचे काम सुरू आहे. ‘माय वे’ अन्यथा ‘हाय वे’ या तत्त्वावर हा समूह काम करत आहे. खंडपीठाची स्थापना करताना फिक्सिंग केले जाते, अशी आवई उठविली जात आहे. कोणा नेत्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले की लगेच हे लोक न्यायालयात त्यांच्या बचावासाठी येतात. अशावेळी निकाल मर्जीनुसार आला नाही तर कोर्टात किंवा बाहेर येऊन प्रसारमाध्यमांद्वारे न्यायालयांवर टीका केली जाते. असे प्रकार कदापि सहन करता येण्याजोगे नाहीत, असे या वकिलांच्या समुहाने पत्रात म्हटले आहे.

PM Narendra Modi
Praful Patel Cleanchit: CBIकडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीनचीट; भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल

निवडणूक काळात समूह आक्रमक

विशेषतः निवडणुकीच्या काळात हा समूह जास्त आक्रमक होतो. ही बाब २०१९ च्या निवडणुकीवेळी पाहायला मिळाली होती. हे प्रकार रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कठोर पावले उचलावीत असे पत्राच्या अखेरीस म्हटले आहे. पत्रावर ज्या प्रमुख वकिलांच्या सह्या आहेत, त्यात मननकुमार मिश्रा, आदिश अग्रवाल, हितेश जैन, उज्ज्वला पवार, उदय होल्ला, स्वरुपमा चतुर्वेदी आदींचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'इतरांना धमकावणे ही काँग्रेसची जुनी संस्कृती आहे. केवळ 5 दशकांपूर्वीच त्यांनी कमिटेड न्यायपालिकेची मागणी केली होती, असं मोदी म्हणाले.

''दमदाटी करणे आणि इतरांवर दबाव आणणे, ही काँग्रेसची संस्कृतीच आहे. पाच दशकांपूर्वी त्यांनीच ‘कटिबद्ध न्यायपालिकां’ची गरज व्यक्त केली होती. आपल्या स्वार्थी हेतूंसाठी काँग्रेसला इतरांकडून कटिबद्धतेची अपेक्षा आहे; मात्र देशाप्रती कटिबद्धता दाखविताना ते पळ काढतात. भारताची १४० कोटी जनता त्यांना नाकारते, यात आश्‍चर्य काहीच नाही.''
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.