Manipur violence: "1993 मध्येही असाच हिंसाचार झाला होता, तेल ओतणाऱ्यांनी शांत बसा...."; PM नरेंद्र मोदी मणिपूरवर राज्यसभेत बोलले!

PM Narendra Modi on Manipur Violence: पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या परिस्थितीवर भाष्य करताना सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली आणि विरोधकांना एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
PM Narendra Modi on Manipur Violence
PM Narendra Modi on Manipur Violenceesakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत मणिपूर मुद्यावर भाष्य केले. विरोधकांनी मणिपूर परिस्थितीवर मोदींच्या शांततेवर सवाल उपस्थित केला होता. यानंतर मोदींनी मणिपूरच्या परिस्थितीवर भाष्य केले आणि विरोधकांना खोचक उत्तर दिले. विरोधक मणिपूरच्या आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, मी त्यांना या कारवाया थांबवण्याचा इशारा देऊ इच्छितो, एक वेळ अशी येईल की मणिपूर स्वतःच त्यांना नाकारेल. ज्यांना मणिपूर, मणिपूरचा इतिहास माहीत आहे, त्यांना माहीत आहे की, तेथे संघर्षाचा मोठा इतिहास आहे, असे मोदी म्हणाले.

या परिस्थितीमुळे या छोट्या राज्यात १० वेळा राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली हे काँग्रेसवाल्यांनी विसरू नये. आमच्या कार्यकाळात असे झाले नाही. काहीतरी कारण असावे. 1993 मध्येही असाच हिंसाचार झाला होता. हा सगळा इतिहास समजून घेऊन पुढे जायला हवे. यामध्ये कोणाला सहकार्य करायचे असेल तर आम्ही सर्वांचे सहकार्य करण्यास तयार आहोत.

मणिपूरची स्थिती-

मोदी म्हणाले की, "मणिपूर ची परिस्थिती पहिल्यापेक्षा चांगली होत आहे. गृहमंत्री अनेक दिवस तिथे राहून आले आहेत आणि गृहराज्यमंत्री अनेक आठवडे मणिपूर मध्ये होते." ते पुढे म्हणाले की, "दोन्ही समाजातील संबंध ठीक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि केंद्र सरकार राज्य सरकार सोबत मिळून न्याय देण्यासाठी सहकार्य करत आहे."

एकत्र काम करण्याचे आवाहन-

मोदींनी विरोधकांना उद्देशून सांगितले की, "आपल्या सगळ्यांना तेथील परिस्थिती ठीक करण्यासाठी एकत्र काम करावं लागेल. ते आपलं कर्तव्य आहे." त्यांनी विरोधकांना आवाहन केले की, "एक वेळ येईल मणिपूर विरोधी पक्षाला स्वीकारणार नाही."

PM Narendra Modi on Manipur Violence
Uddhav Thackeray: अब्दुल सत्तार अन् सुधीर मुनगंटीवार माफी मागणार का? ; अंबादास दानवेंचा बचाव करतांना उद्धव ठाकरेंचा सवाल

कारवाई आणि अटक-

मोदींनी सांगितले की, "11,000 हून अधिक FIR नोंदवण्यात आले आहेत आणि 500 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे." त्यांनी यापूर्वीच्या घटनांचा उल्लेख करताना सांगितले की, "1993 मध्ये मणिपूरमध्ये अशाच प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना सुरू झाल्या होत्या ज्या पाच वर्षे सुरू होत्या."

PM Narendra Modi on Manipur Violence
Rahul Gandhi-Narendra Modi: राहुल गांधींनी PM नरेंद्र मोदींशी हस्तांदोलन केले,अन्... सभागृहात नेमकं काय घडलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.