15 ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन असो की 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पोशाख नेहमीच चर्चेत असतो. यावेळीही त्यांचा पिवळा फेटा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांचा फेटा प्रभू श्रीरामाला समर्पित असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी म्हणजेच 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडपूर्वीच पंतप्रधान मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचले होते. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान उपस्थित होते. यावेळी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आहेत.
यावर्षी पंतप्रधान मोदी यांनी पांढरा कुर्ता-पायजमासोबत, जॅकेट आणि बांधणी प्रिंट फेटा परिधान केला आहे. जो रंगीबेरंगी आहे. त्यांच्या फेट्यामध्ये अनेक रंग असले तरी पिवळा रंग सर्वात जास्त उठून दिसत होता.
2022 मध्ये पंतप्रधान मोदींनी उत्तराखंड टोपी घातली होती. 2021 मध्ये पीएम मोदी जामनगरची पगडी परिधान करून आले होते. तेव्हा त्यांना गुजरातच्या जामनारच्या राजघराण्याने पगडी भेट दिली होती. 2020 मध्ये पीएम मोदी भगव्या फेट्यामध्ये दिसले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.