NDA Meeting Delhi : बैठकीसाठी येताच मोदींनी संविधानावर डोकं टेकवलं; पाहा Video

NDA Meeting Delhi : बैठकीसाठी येताच मोदींनी संविधानावर डोकं टेकवलं; पाहा Video

नवी दिल्लीः दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीसाठी एनडीएमधील घटकपक्षांच्या नेत्यांची उपस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठकीला उपस्थिती असून देशातील विजयी खासदारदेखील उपस्थित आहेत.

दरम्यान, बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या सभागृहात प्रवेश करताच संविधान डोक्याला लावलं आणि नतमस्तक झाले. उपस्थितांनी यावेळी मोदी..मोदी असा जयघोष केला.

NDA च्या बैठकीसाठी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, अजित पवार यांच्यासह घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

यावेळी राजनाथ सिंह यांनी संसदीय गटाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. अमित शाह यांनी या प्रस्तावाचं समर्थन केलं. उपस्थितांनी मोठ्या उत्साहात मोदींच्या नावाला समर्थन दिलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com