नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच अमेरिका दौरा पार पडला. या दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह अनेक अमेरिकन राजकारण्यांशी त्यांची भेटी झाल्या. अनेकांना तर PM मोदींसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. असेच एक खासदार टिम बरचेट यांनी मोदींसोबत सेल्फी घेतला आणि तो ट्विटरवर पोस्ट केला. सोबत त्यांनी कॅप्शनही दिलं. (PM Narendra Modi Shamless Selfie with US MP Tim Burchett)
अमेरिकेच्या काँग्रेसचे सदस्य अर्थात संसदेचे सदस्य असलेले बरचेट यांनी PM मोदींसोबत सेल्फी घेतला. हा सेल्फी ट्विटरवर शेअर करत "शेमलेस सेल्फी, त्यांना बेसबॉल कार्डवर मी सही देखील दिली," असं कॅप्शनही त्यांनी यामध्ये दिलं आहे. विशेष म्हणजे मोदींना देखील हे ट्विट रिट्विट करण्याचा मोह आवरला नाही. हा शेमलेस सेल्फी रिट्विट करत तुम्हाला भेटून आनंद वाटला असं कॅप्शन मोदींनी दिलं आहे. (Latest Marathi News)
टिम बरचेट यांनी आपल्या ट्विटमध्ये शेमलेस मोदी सेल्फी असा शब्द प्रयोग केल्यानं सोशल मीडियावर यावरुन वादंग निर्माण झालं. या अमेरिकन खासदारानं PM मोदींचा शेमलेस असा उल्लेख करत अपमान केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. पण २३ जून रोजी केलेल्या या पोस्टवर अजूनही संबंधित खासदारानं स्पष्टीकरण दिलेलं नाही किंवा माफी मागितलेली नाही, असंही काहींनी म्हटलं आहे. पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे खुद्द PM मोदींनी या खासदाराची पोस्ट रिट्विट करत "तुम्हाला भेटून आनंद वाटला" असं कॅप्शन दिलं आहे. (Marathi Tajya Batmya)
दरम्यान, शेमलेस सेल्फी याचा शब्दशः अर्थ घेण्याची गरज नाही. कारण एखाद्या महत्वाच्या पदावरील व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी घेतलेला आपला फोटो शेअर केल्यानं काहीही फरक पडत नाही. उलट कुठलीही लाज न बाळगता असा फोटो ती व्यक्ती सहजरित्या काढून घेते, यालाच 'शेमलेस सेल्फी' असा शब्द प्रयोग वापरला जातो. बिनधास्तपणे फोटो शेअर करण्यासाठी 'शेमलेस सेल्फी' ही सोशल मीडियावर मोहिम देखील चालवली जाते.
अमेरिकेच्या संसेदत PM मोदींनी भाषण आणि इतर कार्यक्रम पार पडल्यानंतर संपूर्ण सभागृह खाली झालं होतं. यावेळी PM मोदी देखील सभागृहातून बाहेर पडण्याच्या मार्गावर होते त्याचवेळी अमेरिकन खासदार टिम बरचेट यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये मोदींसोबत सेल्फी घेतला. त्यामुळं या सेल्फीमध्ये बरचेट, मोदी यांच्यासह सभागृहातील रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.