Sharad Pawar Birthday: शरद पवारांचे 84व्या वर्षात पदार्पण; राजकीय विरोध विसरून PM मोदींनी दिल्या शुभेच्छा!

देशातील राजकारणात महत्वाचं स्थान असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्येष्ठ शरद पवार याचा आज वाढदिवस आहे.
PM Narendra Modi sharad pawar birthday wishes praful Patel marathi news
PM Narendra Modi sharad pawar birthday wishes praful Patel marathi news
Updated on

देशातील राजकारणात महत्वाचं स्थान असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्येष्ठ शरद पवार याचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवार यांना त्यांच्या ८३व्या वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत मोदींनी निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

"श्री शरद पवार जी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो," अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

"शरद पवार साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे नेतृत्व हे प्रेरणास्थान आहे आणि मला तुमच्यासोबत महाराष्ट्राच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करण्याचा बहुमान मिळाला आहे. पुढील वर्षांमध्ये तुम्हाला चांगले आरोग्य आणि सुख मिळो" अशा शब्दत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सहभागी झालेले नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

PM Narendra Modi sharad pawar birthday wishes praful Patel marathi news
Anand Nirgude Resigned : राज्य मागासवर्ग आयोगच्या अध्यक्षांचा राजीनामा! आयोग बरखास्त होणार?

शरद पवार हे देशातील अनुभवी नेत्यांपैका एक आहेत. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री म्हणून देखील काम केले आहे आणि राजकीय शत्रुत्व असूनही पक्षपातळीवरील नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी शरद पवार ओळखले जातात.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तर वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले. ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असून संरक्षण मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते कृषिमंत्री होते.

PM Narendra Modi sharad pawar birthday wishes praful Patel marathi news
Alexei Navalny : पुतिन यांचे कट्टर विरोधक तुरुंगातून बेपत्ता; कैद्यांच्या यादीतूनही नाव गायब

काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यांनी, तारिक अन्वर आणि पीए संगमा यांनी सोनिया गांधींच्या परदेशी वंशाच्या मुद्द्यावरून काँग्रेस कार्यकारिणीत बंडखोरी केली आणि त्यामुळे पक्षात फूट पडली. महाराष्ट्र, गोवा, मेघालय आणि मणिपूर या राज्यात आपले अस्तित्व प्रस्थापित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख मिळाली. मात्र, या वर्षी पक्षाला हा दर्जा गमवावा लागला आहे.

शरद पवार हे ग्रामीण महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील एकं मोठं नाव आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील महाविकास आघाडीच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज राज्यात शरद पवारांच्या वाढदिवसानिमीत्तर त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()