Video : मोदी येताच चिमुकला येऊन बिलगला; पंतप्रधानांचा लहानग्यांसोबतचा व्हीडिओ व्हायरल

narendra modi todays video
narendra modi todays videoesakal
Updated on

नवी दिल्लीः अखिल भारतीय शिक्षण परिषदेच्या निमित्ताने देशाचे पंतप्रदान नरेंद्र मोदी वेगळ्या अंदाजामध्ये दिसून आले. त्यांनी चिमुकल्यांसोबत गप्पा मारत थेट 'मोदींना ओळखता का?' असाच प्रश्न विचारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचा व्हीडिओ ट्वीटर हँडलवरुन शेअर केला आहे. व्हीडिओमध्ये दिसतंय की, पंतप्रधान एका वर्गात पोहोचतात आणि चिमुकले त्यांच्याभोवती गलका करुन 'नमस्ते मोदीजी..नमस्ते मोदीजी' असं म्हणतात.

narendra modi todays video
Sambhaji Bhide : संभाजी भिडेंचं आज पुन्हा वादग्रस्त विधान; नेहरुंबद्दल बोलतांना म्हणाले...

त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी विचारतात, तुम्हाला मोदीजी माहिती आहेत का? मुलं म्हणतात, हो. आम्ही तुम्हांला टीव्हीमध्ये बघितलं आहे. कुणी म्हणतंय मी तुमचा फोटो बघितलाय. तेवढ्यात एक लाल शर्ट घातलेला चिमुकला येतो आणि थेट मोदींना बिलगतो. उपस्थित सगळेच आवाक् होतात. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चिमुल्यांना काही प्रश्न विचारतात आणि त्यांच्यात सहभागी होतात.

narendra modi todays video
James Anderson Retirement : इंग्लंडचा स्विंग मास्टर 41 वर्षाचा अँडरसन निवृत्तीबाबत म्हणतो; अ‍ॅशेस नंतरही...

त्याआधी, दिल्लीत NEP ला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींच्या अखिल भारतीय शिक्षण परिषदेचं उद्घाटन झालं. कार्यक्रमात बोलतांना मोदी म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशातील प्रत्येक भाषेला योग्य सन्मान आणि श्रेय देईल. जे आपल्या स्वार्थासाठी भाषेचे राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना आता आपली दुकाने बंद करावी लागतील.

'मातृभाषेतील शिक्षण भारतातील विद्यार्थ्यांना न्यायाचे नवीन स्वरूप देत आहे. हे देखील सामाजिक न्यायाच्या दिशेने एक अतिशय महत्त्वाचे पाऊल असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.