काँग्रेसमुळे लोकांचे स्थलांतर; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

केंद्र व उत्तराखंडमध्ये एकापाठोपाठ सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या सरकारांनी राज्यातील जनतेला विकास प्रकल्पांपासून वंचित ठेवले असे मोदी म्हणाले.
Modi
ModiSakal
Updated on

हल्दवानी/डेहराडून : केंद्र व उत्तराखंडमध्ये एकापाठोपाठ सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या (Congress) सरकारांनी राज्यातील जनतेला विकास प्रकल्पांपासून वंचित ठेवले. त्यामुळे, गावागावांतून लोकांना स्थलांतर करण्यास भाग पाडले, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोडले. सुमारे १७,५०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यात ५,७४७ कोटींच्या बहुउद्देशिय लाखवार प्रकल्पाचाही समावेश आहे.

हल्दवानीतील एमबी इंटर कॉलेज महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधानांनी सभेला संबोधित केले. मोदी म्हणाले, की लाखवार प्रकल्पाला १९७४ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. मात्र, तो पूर्ण होण्यासाठी ४६ वर्षे लागली. उत्तराखंडमध्ये यापूर्वी सत्तेवर असलेल्यांनी या प्रकल्पाला एवढा उशीर लावला, हे पाप नव्हे का, तुम्ही हे पाप विसरून जाणार का, असे सवालही त्यांनी मतदारांना उद्देशून केले, असेही त्यांनी नमूद केले.

Modi
पुणे : नवीन कोरोना रुग्णांचा आकडा गुरुवारी तीनशेच्या घरात

पंतप्रधानांनी आज ३,४२० कोटींच्या सहा प्रकल्पांचे उदघाटन केले. यात चारधामला सर्व प्रकारच्या हवामानात जोडणारा रस्त्याच्या तीन वेगवेगळ्या विस्तारित भागांचा तसेच नैनितालमध्ये नमामि गंगा प्रकल्पातंर्गत उभारलेल्या सुरिंगगड जलविद्युतप्रकल्पाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, १४,१२७ कोटींच्या इतर १७ प्रकल्पांचेही भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. मोदी यांचा हा या महिन्यातील दुसरा उत्तराखंड दौरा आहे. यापूर्वी चार डिसेंबरच्या दौऱ्यातही मोदींनी डेहराडूनमध्ये १८ हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन केले होते.

या प्रकल्पांचे उद्‌घाटन

  • सुरिंगगड जलविद्युत प्रकल्प (नमामि गंगा प्रकल्पातंर्गत)

  • चारधामला सर्व हवामानात जोडणारा रस्ता

या प्रकल्पांचे भूमिपूजन

  • कुमाऊॅं येथे ५०० कोटींचे उपग्रह केंद्र

  • मोरादाबाद-काशीपूर चारपदरी रस्ता

  • नेपाळ आणि काशीपूरमीधल अरोमा पार्कदरम्यान पक्के रस्ते

Modi
संसर्ग वाढल्यास निवडणुका लांबणीवर टाका; आयोगाला सरकारचा प्रस्ताव

यापूर्वीच्या सरकारांनी उत्तराखंडची दोन्ही हातांनी लूट केली. केवळ दळणवळच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेकडेही दुर्लक्ष करण्यात आले. लष्करात ‘वन रॅंक वन पेन्शन’, आधुनिक शस्त्रास्त्रे, बुलेट प्रूफ जॅकेट देण्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. दहशतवाद्यांना ठोस प्रत्युत्तर देण्यातही पूर्वीची सरकारे अपयशी ठरली. उत्तराखंडमध्ये विकासप्रकल्पांवर केंद्र व राज्यातील डबल इंजिन सरकारइतका खर्च कोणत्याही सरकारने केला नाही.

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.