चार राज्यांतील कोरोना परिस्थितीचा मोदींनी घेतला आढावा; ठाकरे सरकारचं केलं कौतुक

चार राज्यांतील कोरोना परिस्थितीचा मोदींनी घेतला आढावा; ठाकरे सरकारचं केलं कौतुक
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांच्याशी फोनवरुन बातचित केली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या राज्यातील कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबाबतच्या सध्यस्थितीवर चर्चा केली. तसेच मोदींनी कोरोना विरोधातील लढ्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत टेलिफोनवर बोलताना पंतप्रधानांनी म्हटलं की, महाराष्ट्र कोरोना व्हायरसविरोधातील लढा अत्यंत चांगल्या पद्धतीने लढत आहे.

चार राज्यांतील कोरोना परिस्थितीचा मोदींनी घेतला आढावा; ठाकरे सरकारचं केलं कौतुक
DRDOच्या 2-DG कोरोना प्रतिबंधक औषधाला DGCIची परवानगी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी म्हटलं की, महाराष्ट्र गेल्या वर्षीपासून या जागतिक महासाथीच्या विळख्यात अडकला आहे. भारतात सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा क्रमांक सर्वांत आधी लागतो. या संक्रमणाच्या नव्या लाटेने देखील महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 54,022 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 898 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलंय की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोनवरुन चर्चा करुन सध्यस्थितीबाबत माहिती दिली. सातत्याने घटत असलेल्या पॉझिटीव्हीटी रेट आणि गतीने वाढत असलेल्या रिकव्हरी रेटबाबत देखील त्यांना माहिती दिली.

पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बातचितीनंतर ट्विटरवर हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, त्यांनी पंतप्रधानांना थोडक्यात माहिती दिली की, राज्यामध्ये कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यसाठी काय पावलं उचलली जात आहेत. हॉस्पिटलमधील बेड्सची उपलब्धता आणि लशीकरणाच्या अभियानाबाबत देखील चर्चा झाली. तीन दिवसांमध्ये पंतप्रधान मोदींनी 10 मुख्यमंत्री आणि दोन उपराज्यपालांशी चर्चा करुन राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अवस्थेची खबरबात घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()