२०१४ पूर्वी 'अटकी-लटकी-भटकी'चीच चर्चा - पंतप्रधान मोदी

२०१४ पूर्वीच्या सरकारने भ्रष्टाचार हा आपल्या सरकारच्या प्रणालीतला अत्यावश्यक भाग आहे, असं मानलं, असंही ते म्हणाले.
Narendra Modi
Narendra Modiesakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशात बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या योजनांवरून मोदींनी सुनावलं आहे. पूर्वी लोक 'अटकी-लटकी-भटकी' अशा योजनांबद्दल बोलायचे पण आता त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे, अशा शब्दांत मोदींनी निशाणा साधला आहे. (PM narendra modi take a dig at congress in shimla public meeting)

शिमला इथल्या एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "पूर्वी लोक 'अटकी-लटकी-भटकी' योजनांबद्दल बोलायचे, घराणेशाही, घोटाळे याबद्दल बोलायचे. पण आता वेळ बदलली आहे. आज लोक सरकारी योजनांच्या फायद्यांबद्दल बोलतात. आज भारतातले स्टार्टअप्स जागतिक पातळीवर नाव कमावतायत. भारतात व्यवसाय करणं किती सोयीस्कर आहे, याबद्दल जागतिक बँकही चर्चा करत आहे."

Narendra Modi
मोदी सरकारला ८ वर्षे झाल्यानिमित्त संमेलन; पंतप्रधान देणार ही भेट

पंतप्रधान मोदी शिमलामधल्या गरीब कल्याण मेळाव्यामध्ये बोलत होते. या दरम्यान त्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा ११ वा हफ्ता जारी केला. यावेळी काँग्रेसवर हल्ला करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०१४ पूर्वीच्या सरकारने भ्रष्टाचार हा आपल्या सरकारच्या प्रणालीतला अत्यावश्यक भाग आहे, असं मानलं आणि त्याच्यासोबत लढण्याऐवजी भ्रष्टाचाराचाच बळी ठरलं. देशाने पाहिलं की योजनांचे पैसे गरजूंपर्यंत पोहोचण्याआधी कशा पद्धतीने लुटले गेले.

Narendra Modi
मोदी सरकारने लोकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त कामं केली - सर्वेक्षण

विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या यादीतून आपल्या सरकारने ९ कोटींहून अधिक खोटी नावं काढून टाकली, असंही मोदी म्हणाले. २०१४ च्या पूर्वीपेक्षा आता देशाच्या सर्व सीमा अधिक सुरक्षित असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.