PM Modi on Rahul Gandhi : ...अन् मोदींनी राहुल गांधींना केला फोन; नेमकं काय घडलं? पंतप्रधानांनीच सांगितला किस्सा

''एकदा सोनिया गांधी काशीमध्ये माझ्याविरोधात प्रचार करत होत्या. तेव्हा अचानक त्यांची प्रकृती बिघडली. मला समजल्यानंतर मी त्यांना तातडीने स्पेशल प्लेनने दिल्लीला घेऊन येण्याच्या सूचना दिल्या होत्या.'' असं मोदींनी सांगितलं.
PM Modi on Rahul Gandhi : ...अन् मोदींनी राहुल गांधींना केला फोन; नेमकं काय घडलं? पंतप्रधानांनीच सांगितला किस्सा
Updated on

PM Narendra Modi Interview : भाजपचा प्रमुख विरोध पक्ष काँग्रेस आहे. त्यामुळे प्रचाराच्या रणांगणात भाजपकडून काँग्रेसला कायम टार्गेट केलं जातं. यावेळच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर चांगलंच टीकास्र सोडलं होतं. परंतु एका मुलाखतीत त्यांनी गांधी परिवारासोबत असलेल्या जिव्हाळ्यांच्या संबंधांवर प्रकाश टाकला आहे.

'एबीपी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं कुणाशीही शत्रूत्व नाही असं सांगत नेहरु-गांधी परिवार आणि विशेष करुन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबद्दल चिंता वाटत असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात जेव्हा राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता तेव्हा आपण राहुल गांधींना फोन केल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय सोनिया गांधींची प्रकृती बिघडली तेव्हा त्यांची मदत केली होती, हीदेखील आठवण त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून शेअर केली.

PM Modi on Rahul Gandhi : ...अन् मोदींनी राहुल गांधींना केला फोन; नेमकं काय घडलं? पंतप्रधानांनीच सांगितला किस्सा
Ajit Pawar : ''चॅलेंज स्वीकारते पण नार्को टेस्टचे प्रश्न...'', अंजली दमानियांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

राहुल गांधींना केला होता फोन

पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझा शाही कुटुंबाशी काहीही संबंध नाही. परंतु त्यांच्या अडचणीच्या काळात मी नेहमी त्यांच्यासोबत राहिलेलो आहे. कुठलीतरी निवडणूक होती, तेव्हा महाराष्ट्रात राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरमध्ये गडबड झाली होती. तेव्हा मी त्यांना तातडीने फोन केला होता, असं मोदी म्हणाले.

''एकदा सोनिया गांधी काशीमध्ये माझ्याविरोधात प्रचार करत होत्या. तेव्हा अचानक त्यांची प्रकृती बिघडली. मला समजल्यानंतर मी त्यांना तातडीने स्पेशल प्लेनने दिल्लीला घेऊन येण्याच्या सूचना दिल्या होत्या.'' असं मोदींनी सांगितलं.

PM Modi on Rahul Gandhi : ...अन् मोदींनी राहुल गांधींना केला फोन; नेमकं काय घडलं? पंतप्रधानांनीच सांगितला किस्सा
Pune Porsche Car Accident : 'ते' ब्लड सॅम्पल अल्पवयीन आरोपीच्या आईचं नाही; शिवानी अग्रवाल यांची चौकशीही नाही, पोलिसांचा खुलासा

..जेव्हा सोनिया गांधींच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक आठवण सांगताना म्हटलं की, एकदा दमन येथे त्यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. त्यामध्ये सोनिया गांधी आणि अहमद पटेल होते. तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. मी अहमदभाईंशी चर्चा केली आणि तात्काळ एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्थ करत असल्याचं सांगितलं. परंतु त्यांनी आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं.. ही आपुलकी आहे, आपण सगळे देशासाठी काम करणारे लोक आहोत.. यामध्ये मी कधीही राजकारण करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.