PM Modi on UCC : एका घरात दोन कायदे असतात का? समान नागरी कायद्यासाठी मोदींनी दिले बांगलादेशचे उदाहरण

देशातील मुस्लीम राजकारणाचे शिकार होत असल्याचंही ते म्हणाले.
PM Modi on UCC
PM Modi on UCCeSakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) पाच वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा कंदिल दाखवला. यानंतर त्यांनी मेरा बूथ-सबसे मजबूत या कार्यक्रमात लोकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी समान नागरी कायद्याबद्दलही भाष्य केलं. तसंच, देशातील मुस्लीम राजकारणाचे शिकार होत असल्याचंही ते म्हणाले. (Modi on UCC)

एका घरात दोन कायदे कशाला?

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, की समान नागरी कायद्याबद्दल (Uniform Civil Code) लोक चुकीच्या अफवा पसरवत आहेत. एका कुटुंबामध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळे नियम असतील, तर ते कुटुंब पुढे कसे जाईल? देशात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालय प्रयत्न करत आहे. मात्र, व्होट बँकसाठी काही लोक या कायद्याला विरोध करत आहेत. ते मध्य प्रदेशात बोलत होते.

PM Modi on UCC
PM Narendra Modi: 'मी जेव्हा अमेरिकेत गेलो तेव्हा...', मोदींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितली भाजपची खरी ताकद

मुस्लिमांचा राजकारणासाठी वापर

पंतप्रधान म्हणाले, की देशातील मुस्लिम बांधवांचा काही लोक राजकारणासाठी वापर करतून घेत आहेत. राजकीय पक्ष तुम्हाला भडकवून, आपला फायदा करून घेत आहेत हे देशातील मुस्लिमांनी लक्षात घ्यायला हवं. या राजकारणामुळेच त्यांचं मोठं नुकसान होत आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

मुस्लिम देशांमध्ये तीन तलाक बंद

"तीन तलाक हा नियम मुस्लिम मुलींसाठी अन्यायकारक आहे. जे लोक याचं समर्थन करतात, ते केवळ मतांचे भुकेले आहेत. तीन तलाक संपूर्ण कुटुंबाला उद्वस्त करतं. मी नुकताच इजिप्त दौऱ्यावर होतो. त्या देशामध्ये सुमारे ८०-९० वर्षांपूर्वीच ट्रिपल तलाक रद्द केला आहे. यासोबतच कतार, इंडोनेशिया, बांगलादेश अशा मुस्लिम बहुल देशांमध्येही ट्रिपल तलाक बंद करण्यात आला आहे." असंही मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

PM Modi on UCC
BJP: केंद्रासह भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार; लवकरच मोदी शहा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.