PM Modi: '2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना रोखणे जवळजवळ अशक्य'; ब्रिटिश वृत्तपत्राचा दावा

PM Modi: तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे मिळालेला आत्मविश्वास, पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामुळे भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणे निश्चित आहे आणि कोणीही रोखू शकत नाही, असा दावा ब्रिटिश वृत्तपत्राच्या लेखात केला आहे.
PM Modi
PM ModiEsakal
Updated on

लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले असून सर्वच राजकीय पक्ष सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, ब्रिटनमधील प्रमुख वृत्तपत्र 'द गार्डियन'मध्ये एक लेख लिहिला गेला असून, त्यामुळे विरोधी पक्षांची निराशा होऊ शकते. लेखात असा दावा करण्यात आला आहे की, '२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सरकार स्थापन करणार हे निश्चित आहे आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही.'

'भाजपला रोखणे जवळपास अशक्य'

हा लेख हॅना अॅलिस पीटरसन यांनी लिहिला होता. पीटरसन लिहितात की, 'तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे मिळालेला आत्मविश्वास, पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामुळे भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे निश्चित आहे. त्यांना थांबवणे जवळजवळ अशक्य आहे. तीन राज्यांतील विजयानंतर खुद्द पंतप्रधान मोदीही 2024 मध्ये विजयाचे भाकीत करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.

लेखानुसार, भारताच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आणि राजकीय विश्लेषकांमध्ये एक प्रकारचे एकमत आहे की, पंतप्रधान मोदी आणि भाजपचा विजय निश्चित आहे.

PM Modi
Delhi Weather Update: धुकं आणि प्रदूषणाची चादर! दिल्ली-एनसीआरला वर्षाच्या पहिल्याच दिवशी फटका, 21 ट्रेन धावल्या उशिराने

'भाजपच्या हिंदुत्व आणि राष्ट्रवादाच्या अजेंड्यामुळे मतदार प्रभावित'

पीटरसन पुढे लिहितात की 'पंतप्रधानांची लोकप्रियता आणि एक मजबूत नेता म्हणून त्यांची प्रतिमा, तसेच भाजपच्या हिंदू राष्ट्रवादी अजेंडा, विशेषत: उत्तर भारतातील हिंदी पट्ट्यातील हिंदू मतदार मोठ्या संख्येने प्रभावित आहेत. 2014 पासून, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर देशातील जनमत मोठ्या प्रमाणात भाजपकडे झुकले आहे. लेखात लिहिले आहे की, 'भारताच्या दक्षिण आणि पूर्व भागात भाजपपेक्षा विरोधी पक्ष ताकदवान आहेत, पण राष्ट्रीय पातळीवर विरोधक विखुरलेले आणि कमकुवत दिसतात.'

PM Modi
Special Clock : भाजीपाला विक्रेत्यानं तयार केलं खास घड्याळ; सांगतं तब्बल आठ देशांची वेळ

'अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधी आघाडी अद्याप एकजूट झालेली नाही'

गार्डियनच्या लेखात काँग्रेसबद्दल लिहिले आहे की, 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये विजय मिळवला आहे, परंतु तीन राज्यांमध्ये ते अजूनही सत्तेत आहे आणि पक्ष अंतर्गत कलहाचा सामना करत आहे. विरोधी पक्षांनी युती केली असली तरी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षांचे अद्याप एकमत झालेले नाही. मात्र, हे सर्व पक्ष भाजप विरोधात एकदिलाने लढणार असल्याची चर्चा आहे. सध्या भाजपचा विजय निश्चित दिसत असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()