ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर PM मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

Omicron: देशात सध्या ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढली आहे.
PM-Narendra-Modi
PM-Narendra-Modisakal
Updated on

नवी दिल्ली: ओमिक्रॉन (Omicron) या कोरोना विषाणुच्या नव्या व्हेरीअंटने सध्या जगाची चिंता वाढवली आहे. त्यानंतर देशात देखील ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याचं दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ओमिक्रॉनच्या संसर्गाची सध्याची परिस्थितीत जाणून घेण्यासाठी आढावा बैठक बोलावली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बुधवारी सकाळपर्यंत नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता २१३वर पोहोचली आहे.

PM-Narendra-Modi
अधिवेशन मुदतीआधी गुंडाळले; लोकसभा व राज्यसभेतील कामकाजाचा टक्का घसरला

देशातील वेगवेगळ्या राज्यांत ओमिक्रॉनने आता हातपाय पसरायला सुरूवात केली असून, दिल्लीत आता पर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीत ५७, महाराष्ट्रात ५४, तेलंगाणामध्ये २४, कर्नाटकमध्ये १९, राजस्थानमध्ये १८, केरळमध्ये १५, गुजरातमध्ये १४ आणि मध्यप्रदेशमध्ये देखील ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे.

PM-Narendra-Modi
‘ओमिक्रॉन’ची धास्ती वाढली

आरोग्य मंत्रालयाने राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना ओमिक्रॉन व्हेरीअंटमुळे होणाऱ्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात, केंद्राने स्थानिक अधिकाऱ्यांना नाईट कर्फ्यू, मोठ्या मेळाव्यांवर कडक निर्बंध, विवाह आणि अंत्यसंस्कारातील संख्या कमी करणे, कार्यालये आणि सार्वजनिक वाहतुकीतील संख्या मर्यादित करण्यासंदर्भात निर्बंध लागु करण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.