Budget Session : पंतप्रधान मोदी आज लोकसभेत बोलणार

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला PM मोदी आज उत्तर देणार.
PM Modi in Parliament
PM Modi in Parliament Team eSakal
Updated on

दिल्ली: लोकसभेत (Loksabha) आज राष्ट्रपतींच्या (President of India) अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उत्तर देणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे (Covid19 Third Wave) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं (Financial Session of Parliament) कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरू आहे. राज्यसभेचं कामकाज सकाळी १० वाजता सुरू होईल, तर लोकसभेचं कामकाज संध्याकाळी सुरू होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात चालणार आहे. संसदीय कामकाजावरील केंद्रीय समितीने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी आणि दुसरा टप्पा १४ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत बोलावण्याची शिफारस केली आहे. (PM Modi in Parliament)

PM Modi in Parliament
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ बंद; सोमवारपासून पूर्ण उपस्थिती
PM Modi in Parliament
पत्नीचं तिकिट कापल्यानं खूश झालेल्या नेत्याला भाजपची उमेदवारी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसाठी केलेल्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली. हे अधिवेशन ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे. १२ फेब्रुवारीपासून एक महिन्याची सुट्टी असेल आणि दुसरा टप्पा १४ मार्चपासून सुरू होईल. या टप्प्यातील कामकाज ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे. दरम्यान, यूपीसह पाच राज्यांच्या निवडणुका होणार असून त्याचे निकाल येणार आहेत. त्याचा परिणाम दुसऱ्या टप्प्यात दिसून येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.