PM Modi: मोदींनी पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा कधी वापरला होता? काझीरंगाच्या भेटीनंतर आठवला 'तो' किस्सा

Assam Kaziranga National Park : काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये रात्री मुक्काम करणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरले आहेत. शुक्रवारी रात्री ते या उद्यानात आले आहेत.
PM Modi
PM Modi
Updated on

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी-सकाळी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये रात्री मुक्काम करणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरले आहेत. शुक्रवारी रात्री ते या उद्यानात आले आहेत. याठिकाणचे पंतप्रधान मोदींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. (PM Narendra Modi took the elephant and jeep safari in Assam Kaziranga National Park 198788 Digital Camera story)

एका फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये कॅमेरा पाहायला मिळत आहे. मोदींच्या हातातील हा कॅमेरा पाहून लोकांना एक किस्सा नक्कीच आठवला असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये डिजिटल कॅमेऱ्याचा एक किस्सा सांगितला होता की, त्यांच्याकडे १९८७-८८ मध्ये कॅमेरा होता. नेटकऱ्यांनी त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांची खिल्ली उडवली होती. कारण, १९९५ मध्ये पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा लाँच करण्यात आला होता.

PM Modi
'पंतप्रधान मोदी यांच्याच नव्हे, तर कोणाच्याच वयाबद्दल बोलू नये'; संभाजीराजेंच्या टीकेला महाडिकांचे प्रत्युत्तर

काय होता किस्सा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की, १९८७-८८ मध्ये त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते एलके अडवाणी यांचा रंगीत फोटो काढण्यासाठी डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केला होता. तसेच दिल्लीमध्ये फोटो पाठवण्यासाठी ई-मेलचा वापर केला होता. यावर अनेकांनी आक्षेप घेत म्हटलं होतं की, १९९५ मध्ये ई-मेल सेवा सुरु झाली. मग, मोदींनी त्याआधीच ई-मेलचा वापर कसा केला.

ईमेलचा उपयोग जगाने अधिकृतपणे १९९५ मध्ये सुरु केला. पण, मोदींनी १९८८ पासूनचा याचा उपयोग केल्याचं दिसतंय, असं म्हणत एकाने खिल्ली उडवली होती. न्यूज नेशनला दिलेल्या एका मुलाखतीत मोदी म्हणाले होते की, १९८७-८८ मध्ये मी पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा वापरा. त्यावेळी खूप कमी लोकांकडे ई-मेल होता. अडवाणींची सभा होती. त्यावेळी मी माझ्याकडील डिजिटल कॅमेऱ्याने अडवाणींचा फोटो घेतला आणि तो दिल्लीला पाठवला. कलर फोटो काढण्यात आला होता. फोटो पाहून अडवाणी आश्चर्यचकित झाले होते.

PM Modi
देशाला कायमचं कर्जात बुडवून मोदी एक दिवस संन्यासाला जातील; भाजप, काँग्रेससह पंतप्रधानांवर आंबेडकरांची सडकून टीका

लोकांनी उडवली होती टर

पंतप्रधान मोदींच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता. पहिला डिजिटल कॅमेरा लाँच होण्यापूर्वी आठ वर्षआधी मोदींनी तो वापरला होता. तसेच ईमेल लाँच होण्याच्या सात वर्षाआधीच मोदींनी त्याचा वापर केला असं म्हणत लोकांनी टर उडवली होती. दरम्यान, मोदींच्या हातात कॅमेरा पाहून मोदींचा हा दावा लोकांना नक्की आठवला असेल. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.