पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 'ड्रॅगन'ला प्रत्युत्तर

Narendra Modi
Narendra Modiesakal
Updated on
Summary

'या' नवीन मार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्याचा प्रस्ताव ग्रामसभेत ठेवण्यात आला होता.

सिक्कीममधील (Sikkim) सोमगो तलाव (Tsomgo lake) आणि नाथुला बॉर्डरला (राजधानी गंगटोकशी) जोडणाऱ्या रस्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं नाव देण्यात आलंय. या नव्यानं बांधलेल्या रस्त्याचं राज्यपाल गंगा प्रसाद यांच्या हस्ते आज अधिकृत उद्घाटन करण्यात आलं. नाथुला सीमेवरील गंगटोकशी जोडणाऱ्या जुन्या मार्गाला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव देण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 19.51 किमी लांबीचा हा रस्ता प्रवाशांसाठी वर्षभरापासून सुरू आहे, परंतु आता त्याचं अधिकृतपणे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. सिक्कीम भाजपचे प्रदेशाध्यक्ष डीबी चौहान यांनी रस्त्याच्या उद्घाटनाबाबत माहिती दिलीय.

उद्घाटनाचे फोटो शेअर करत त्यांनी लिहिलंय की, मार्गच्या उद्घाटनाला माननीय राज्यपाल गंगा प्रसाद (Governor Ganga Prasad) यांच्यासह नरेंद्र मोदी उपस्थित होते. कयोंगासला येथील ग्रामपंचायत शेजारी या रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं. चांगू तलावाला जोडणाऱ्या या नवीन पर्यायी मार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलंय. 20 डिसेंबर रोजी या नवीन मार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्याचा प्रस्ताव ग्रामसभेत ठेवण्यात आला होता. तो एकमतानं मंजूर करण्यात आला. हा रस्ता बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनं (Border Road Organization) बांधलाय.

Narendra Modi
Hercules Temple : स्पेनमध्ये सापडलं 9 व्या शतकातलं प्राचीन मंदिर
Tsomgo Lake Road
Tsomgo Lake Road

या नवीन रस्त्याच्या निर्मितीमुळं गंगटोक ते सोमगो तलावाचं अंतर 15 किमीनं कमी झालंय. कोरोना महामारीच्या (Coronavirus) काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे लोकांना मोफत लस आणि रेशन उपलब्ध करून दिली, ते पाहता हा सन्मान दिल्याचं ग्रामसभेतील लोकांनी सांगितलं. इतकंच नाही तर डोकलामच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनशी (China) ज्याप्रकारे व्यवहार केला, तेच एक कारण आहे, ज्यामुळं या रस्त्याचं नाव त्यांच्या नावावर ठेवण्याची प्रेरणा मिळाली. ज्या रस्त्याचं उद्घाटन झालं आहे, तेथील 80 टक्के लोक भारतीय लष्करात (Indian Army) आहेत.

Narendra Modi
महिलेनं तीन महिन्यांत दोन मुलांना दिला जन्म

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.