इंडिया गेटवर नेताजींच्या होलोग्राम प्रतिमेचं PM मोदींच्या हस्ते अनावरण

इंडिया गेटवर नेताजींच्या होलोग्राम प्रतिमेचं PM मोदींच्या हस्ते अनावरण
Updated on

नवी दिल्ली : आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त इंडिया गेटवर त्यांच्या होलोग्राम प्रतिमेचं अनावरण केलं आहे. याच ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रेनाईटचा पुतळा बसवण्यात येणार आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी या पायाभरणी समारंभात 2019, 2020, 2021 आणि 2022 या वर्षांसाठी सुभाष चंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार प्रदान केले आहेत.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय की, या ठिकाणाहून आपली संसद जवळ आहे. क्रियाशीलता आणि लोकनिष्ठेचं प्रतिक असणारे अनेक भवन जवळ आहेत. वीर शहिदांचं नॅशनल मेमोरियलदेखील जवळ आहे. त्यामुळेच हे ठिकाण सर्वांना प्रेरणा देईल. आज आपण इंडिया गेटवर अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि नेताजींना आदरांजी देत आहोत.

इंडिया गेटवर नेताजींच्या होलोग्राम प्रतिमेचं PM मोदींच्या हस्ते अनावरण
पार्लमेंट हाऊस कॉम्प्लेक्समध्ये ८७५ जण कोविड पॉझिटिव्ह!

पुढे ते म्हणाले की, नेतांजींनी स्वाधीन आणि स्वतंत्र भारताचा विश्वास दिला. ज्यांनी मोठ्या गर्वाने, मोठ्या आत्मविश्वासाने साहसाने, इंग्रजी सत्तेसमोर सांगितलं की मी स्वातंत्र्याची भीक घेणार नाही तर मी ती हिसकावून घेईन. ज्यांनी भारताच्या जमिनीवर पहिलं स्वतंत्र सरकार स्थापन केलं. त्यांना आदरांजली म्हणून आज नेताजींची प्रतिमा डिजीटल पद्धतीने इंडिया गेटवर स्थापन झालीये. लवकरच या ठिकाणी ग्रेनाईटची प्रतिमा लावण्यात येईल. ही स्वांतत्र्याच्या नायकाला आदरांजली आहे, असं त्यांनी म्हटलंय.

पुढे ते म्हणाले की, हा पुतळा आपल्याला राष्ट्रीय कर्तव्याची आठवण करुन देईल. येणाऱ्या पिढीला प्रेरणा देईल. गेल्या वर्षीपासून नेताजींची जयंतीला पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जात आहे. आज यानिमित्ताने आपदा प्रबंधन पुरस्कार दिले गेले आहेत. त्यांच्याकडून प्रेरण घेऊनच हे दिले गेले आहेत सर्व व्यक्ती सर्व संस्थांचा आज सत्कार झाला त्यांचंही अभिनंदन मोदींनी केलं.

इंडिया गेटवर नेताजींच्या होलोग्राम प्रतिमेचं PM मोदींच्या हस्ते अनावरण
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

अद्वैत गडानायक (Sculptor Awaita Gadanayak) नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhas Chandra Bose) यांच्या प्रस्तावित पुतळ्याचे शिल्पकार असणार आहेत.

कोण आहेत अद्वैत गडानायक

> अद्वैत गडानायक यांचा जन्म ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील नेउलापोई गावात झाला आहे.

> गडानायक यांनी बीके कॉलेज ऑफ आर्ट्स अँड क्राफ्ट्समधून कला शिक्षण घेतले आहे आणि दिल्ली आर्ट कॉलेजमधून मास्टर्स पूर्ण केले.

> गडनायक हे लंडनमधील स्लेड स्कूल ऑफ फाइन आर्ट्समध्ये कलेचा अभ्यास करतात. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. यामध्ये 1993 चा राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार; 1999 मध्ये ओडिशा ललित कला अकादमी पुरस्कार इ. पुरस्कारांचा समावेश आहे.

> त्यांच्या सर्वात प्रसिद्ध प्रकल्पांमध्ये राजघाटातील गांधींच्या दांडी मार्चच्या पुतळ्याचा समावेश आहे. त्यांच्या कलाकृतींना लंडनमध्येही स्थान मिळाले आहे.

> 2016 मध्ये ते नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे दिग्दर्शक बनले. त्याआधी ते भुवनेश्वरच्या KIIT विद्यापीठात स्कुल ऑफ स्कल्पचरचे प्रमुख होते. युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये त्यांनी एक शिल्पकार उद्यान तयार केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.