नरेंद्र मोदींनी म्हणून 5 एप्रिल हा दिवस निवडला?
नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 5) रात्री 9 वाजता 9 मिनिटं आपल्या दरवाजात किंवा बालकणीमध्ये दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. पण, पाच एप्रिल हाच दिवस का निवडला, यामागे विशेष असे कारण आहे.
नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या 14 दिवसांमध्ये 05 एप्रिल हाच दिवस का निवडला? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण, 5 एप्रिल या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. या घटना काय आहेत आणि हाच दिवस का निवडला याचे महत्त्व काय आहे जाणून घेऊयात.
राष्ट्रपिता महत्मा गांधीजी यांची दांडी यात्रा याच दिवशी त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला होता. या दांडी यात्रेला खास महत्त्व आहे. हे आंदोलन राजकारणातील अहिंसक आंदोलनाचा एक महत्त्वपूर्ण प्रयोग होता. दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे बाबू जगजीवन राम यांचा जन्म 5 एप्रिल 1908 रोजी झाला होता. त्यांनी 50 वर्ष संसदेत राहण्याचा विश्वविक्रम केला आहे. 1936 ते 1986 साली ते संसदेत होते. त्यांनी वंचितांसाठी अनेक प्रयत्न केले होते. तिसरी महत्त्वाची घटना भारतीय नौदलासाठी महत्त्वपूर्ण दिवस. या दिवशी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. 1919 साली भारतीय मर्चेंट शिपिंगची सुरुवात झाली होती. दुसरे म्हणजे यावेळी इंग्रजांनी आपल्या सागरी तटांवर कब्जा केला होता. त्याचवेळी मुंबईला बॉम्बे हे नाव मिळाले. 1979 मध्ये देशातील पहिले नौदल संग्रहालय उभारण्यात आले होते.
मोदींनी काय आवाहन केले पाहा...
कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटापासून दूर जाण्याचा सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या काळात देशातील जनतेने मोठे सहकार्य केले. जनतेने २२ मार्चला जनता कर्फ्यूचे पालन केले. त्यानंतर आता येत्या रविवारी म्हणजे पाच एप्रिलला कोरोनाच्या संकटाला आव्हान द्यायचे आहे. त्याला प्रकाशाच्या शक्तीचे परिचय करुन द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटं द्यायची आहेत. घरातील सर्व लाईट्स बंद करून बाल्कनी किंवा दरवाजासमोर मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट लावावी. अंधाराला दूर करून प्रकाश दाखवायचा आहे. त्यामुळे हे सिद्ध होईल की कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपण एकटे नाहीतर सर्व एकत्र आहोत हे समजणार आहे.
...पण कोणीही एकत्र येऊ नका
आपल्या दरवाजा किंवा बाल्कनीतून हे सर्व करायचे आहे. सोशल डिस्टंन्सिंगचा नियम तोडायचा नाही. कोरोनाची साखळी तोडण्याचा हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे हे करताना कोणीही रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी एकत्र येऊ नये, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.